Wednesday, May 8, 2024
घरमानिनीअचानक कमी का होतो मासिक पाळीचा फ्लो? यापासून कसा बचाव कराल?

अचानक कमी का होतो मासिक पाळीचा फ्लो? यापासून कसा बचाव कराल?

Subscribe

प्रत्येक महिलेची मासिक पाळी अधिक दिवस राहत नाही. काही महिलांमध्ये मासिक पाळींचे दिवस हे २-३ दिवस सुद्धा असू शकतात. परंतु यामध्ये अचानक कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास तर तो चिंताजनक ठरु शकतो. जर तुमच्या मासिक पाळीचा फ्लो कमी झाला असेल तर हे शरिरात होत असलेल्या बदलावाचे संकेत आहेत. यामुळेच गरेजेचे आहे की, यामागील कारण काय आहेत हे समजून घेणे. जेणेकरुन आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे.

आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीत ही फार बदल झाला आहे. याच कारणास्तव मासिक पाळीच्या सायकलमध्ये अनियमितता होण्यास सुरु होतो. जंक, प्रोसेस्ड फूड, पॅक फूड सुद्धा तुमच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्याचसोबत वाढलेला स्क्रिन टाइम सुद्धा तुमच्या मासिक पाळीला नुकसान पोहचवू शकतो. काही वेळेस तणाव, अपुरी झोप किंवा खराब लाइफस्टाइल सुद्धा तुमची मेंस्ट्रुअल हेल्थ सुद्धा प्रभावित होऊ शकते.

- Advertisement -

मासिक पाळीचा फ्लो अचानक कमी होण्यामागील सामान्य कारणं
-सर्वाधिक मोठे कारण तणाव
शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे तणाव सुद्धा तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकतो. तणावामुळे तुमची मासिक पाळी प्रभावित होऊ शकते. तुमच्या हार्मोन मध्ये बदल होऊ शकतो आणि अशातच तुमच्या मासिक पाळीची सायकल बदलू शकते. तसेच तुमच्या मासिक पाळीचा फ्लो कमी होऊ शकतो.

- Advertisement -

-अचानक वजन कमी होणे
जर तुमचे अचान वजन कमी करता तर तुम्हाला स्कँटी पीरियड (मासिक पाळीचा फ्लो कमी) होण्याची शक्यता असते. कारण फॅटच्या रुपात शरिरात रिप्रोडक्टिव्ह हार्मोन एस्ट्रोजन असतात. जसे फॅट कमी होते तेव्हा हार्मोनसुद्धा शरिरात कमी होतात. ज्यामुळे मासिक पाळीचा फ्लो कमी अथवा दीर्घकाळ मासिक पाळी येते.

-व्यायाम न करणे
कोणतीही गोष्ट न करणे अथवा गरजेपेक्षा अधिक करणे हे दोन्ही सुद्धा धोकादायक ठरु शकते. जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल किंवा अधिक व्यायाम करत असाल तर तुमची मासिक पाळी प्रभावित होऊ शकते. कमीत कमी ३०-४५ मिनिटे व्यायाम केला तरीही पुरेसा आहे.

-थायरॉइड
मासिक पाळीत अनियमिता कमी किंवा अधिक होण्यामागील मोठे कारण थायरॉइड हार्मोचे असंतुलित असणे असू शकते. आजकाल थायरॉइडी समस्या प्रत्येक दूसऱ्या व्यक्तीला सुद्धा सतावत आहे. थायरॉइडमुळे शरिराचे वजन फार कमी वेगाने वाढते, ज्यामुळे सुद्धा स्कँटी पीरियड किंवा मासिक पाळीचा फ्लो कमी होऊ शकतो.

काय कराल?
-व्यायाम करा
मासिक पाळीदरम्यान दररोज हलक्या स्वरुपाचा व्यायाम करा. जेणेकरुन मासिक पाळीचा फ्लो सोप्पा होतो. जर तुम्हाला कार्डिओ व्यायाम करणे आवडत नसेल तर योगा तुम्ही करु शकता. यामुळे मासिक पाळीदरम्यान येणारे क्रँम्प आणि मूड स्विंग सुद्धा ठिक होतात.

-बिटाचे सेवन करा
बिटामध्ये खुप पोषक तत्व असतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, विटामिन ए, विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्निज, फोलिक अॅसिड आणि फायबर असते. बीट शरिरातील हिमग्लोबिनचा स्तर वाढतो.

-पुरेसे पाणी प्या
मासिक पाळीदरम्यान शरिरातून केवळ रक्तच नव्हे तर त्याचसोबत काही अन्य तरल पदार्थ जसे की, पाणी सुद्धा असते. तर अतिशय जाड असलेले रक्त शरिरातून बाहेर पडण्यास मुश्किल होते. यामुळेच तुम्हाला अधिक पाणी प्यायले पाहिजे.

 


हेही वाचा: सॅनिटरी पॅड…मेंस्ट्रुअल कप की टॅम्पॉन? मासिक पाळीदरम्यान बेस्ट पर्याय कोणता?

- Advertisment -

Manini