Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी हवाई दलाच्या विदेशी युद्धसरावात राफेलचा सहभाग, भारताबरोबरच इतर देशांचाही समावेश

हवाई दलाच्या विदेशी युद्धसरावात राफेलचा सहभाग, भारताबरोबरच इतर देशांचाही समावेश

Subscribe

भारतीय हवाई दलाची एक तुकडी फ्रान्सच्या युद्ध सरावात सहभाग घेणार आहे. ही तुकडी फ्रान्सच्या मोंट-डी-मार्सन मिलिट्री बेस येथे होणाऱ्या युद्ध सरावात तैनात करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये हा युद्धसराव जवळपास तीन आठवडे चालणार आहे. तर या युद्ध सरावासाठी चार राफेल, दोन सी-17 विमान, दोन आयएल -78 मिज एअर रिफ्युलर तैनात करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आईएएफची एक तुकडी मोंट-डी-मार्सन येथील युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना होणार आहे. या युद्ध सरावाचे आयोजन 17 एप्रिल ते 5 मे या कालावधीत करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलात राफेल दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच विदेशी युद्धसराव अभ्यासात सहभागी होणार आहे.

- Advertisement -

भारतीय हवाई दलातील सेना आणि फ्रेंच एअर अॅन्ड स्पेस फोर्सबरोबर जर्मनी, ग्रीस, इटली, नेदरलँड, युनायटेड किंगडम, स्पेन आणि अमेरिकेचे हवाई दल या युद्ध सरावात सहभागी होणार आहेत.

राफेल हे दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल वायुसेनेत सहभागी होणे म्हणजे गेम चेंजर असल्याचे म्हटले होते. त्याचप्रमाणे संरक्षण तज्ज्ञांच्या मते, राफेल मिळाल्यानंतर हवाई दलाने मोठी उंची गाठली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : ९ गोळ्या अन् २ शूटर ठार…असदला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला, पण…वाचा एन्काऊंटरचा संपूर्ण


 

- Advertisment -