Corona Live Update: अखेर उद्यापासून लोकल सुरू होणार; पण…

Corona Live Update: अखेर उद्यापासून लोकल सुरू होणार; पण…

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  मुंबईची उपनगरीय लाेकल सेवा सोमावरपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वे मार्गवर 200 तर पश्चिम रेल्वे मार्गावर 120 अशा एकूण 320 लोकल फेऱ्याचं नियोजन केले आहे. राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वे मिळून हा निर्णत घेतलेला आहे. याला रेल्वे बोर्डाने सुद्धा मान्यता दिली आहे.


जायखेडा कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मेहनत घेतली होती. परिणामी, जायखेडा तब्बल दोन महिन्यांच्यावर कोरोनामुक्त राहिला. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर जायखेड्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी (१४) पुन्हा सटाणा शहरात २ तर जायखेडा येथे १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जायखेडावासियांची चिंता वाढली आहे. जायखेड्यात ११ व तालुक्यात १४ रुग्ण आहेत. त्यापैकी १ सोमपूर, ३ जयपूर, ६ जायखेडा असे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. (सविस्तर वृत्त)


गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकाऱ्यांना दिल्लीतील संशयित कोविड -१९ केसेसमधील रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यात व नाशिक शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा 2 हजाराच्या नजीक पोहचला आहे. रविवारी (दि.14) जिल्ह्यात 93 नवे आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 60 व नाशिक ग्रामीणमधील 33 रुग्णांचा समावेश आहे.  दिवसभरात शहरात दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 973 बाधित रुग्ण असून नाशिक शहरात 678 रुग्ण बाधित आहेत. (सविस्तर वृत्त)

मुंबईमध्ये आज १ हजार ३९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता ५८ हजार १३५ इतकी कोरोनाबाधितांची एकूण संख्या झाली आहे. (सविस्तर वृत्त)


राज्यात आज ३ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ६३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५० हजार ९७८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ५३ हजार ०१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण १ लाख ०७ हजार ९५८ इतकी झाली आहे. (सविस्तर वृत्त)


कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने नवीन एम्स हेल्पलाईन नंबर सुरू केले आहेत. ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे.


लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४७७ गुन्हे दाखल झाले असून २५८ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४७७ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ N.C. आहेत) नोंद १३ जून २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. (सविस्तर वृत्त)


करोनामुक्त असलेल्या  त्र्यंबकेश्वर तालुक्यात करोनाने प्रवेश केला असून , त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासह हरसूल पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक व नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी  करोनाबाधित आढळून आले आहेत. रविवारी दिवसभरात 37 नवे रुग्ण पोझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 5, मालेगाव 1 आणि नाशिक ग्रामीणमधील 31 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 947 रुग्ण करोनाबाधित आहेत. (सविस्तर वृत्त)

गृहमंत्री अमित शहा यांचे दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठीचे निर्देश


मुंबईत लवकरच लोकल सुरू होण्याची शक्यता. रेल्वेने राज्य सरकारला कर्मचाऱ्यांची यादी मागितली. (सविस्तर वृत्त)


मुंबईतील धारावी परिसरात १३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत धारावीत कोरोनाबाधितांची संख्या २०४३ झाली आहे. यामध्ये ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी परिसरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनतर्फे या रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जात आहेत. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार आदित्य ठाकरेदेखील उपस्थित. (सविस्तर वृत्त)


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन बैठकीसाठी दाखल, गृहमंत्री अमित शहादेखील बैठकीला उपस्थित.


केंद्रीयय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या भेटीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पोहोचले.


बीडमध्ये चार पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल

बीड शहरातील मसरत भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीला उपचारासाठी काही दिवसापूर्वी हैदराबादला नेण्यात आले होते. यासाठीची रीतसर परवानगी या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र हैदराबादहून परत आल्यानंतर या कुटुंबातील सदस्यांनी होम क्वॉरंटाईन राहणे असे अपेक्षित होते. मात्र घरात न राहता बरेच दिवस या कुंटुबातील व्यक्ती हे घराबाहेर फिरत होते. (सविस्तर वाचा)


कोरोनाबाधित मातांच्या सुखरूप प्रसूतीने ३०० चा टप्पा केला पार!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात ‘कोरोना कोविड १९’ बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा काल रात्री ओलांडून कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. आज सकाळ पर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. (सविस्तर वाचा)


मुंबईची लाईफलाईन पुन्हा होणार सुरू

मुंबईची लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल सेवा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे काहिशी ठप्प झाली आहे. कोरोनाचे वाढते संकट आणि होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो नागरिकांना ने-आण करणारी मुंबईची लोकल ट्रेन देखील कोरोनामुळे शांत झाली. (सविस्तर वाचा)


देशभरात २४ तासांत ११ हजार ९२९ नवे रुग्ण

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ११ हजार ९२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ लाख २० हजार ९२२ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ४९ हजार ३४८ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ६२ हजार ३७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ९ हजार १९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू

पुण्यात एका दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा कोरोनाने मृत्यू झाला असून ही बाब लपवण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित बालकाच्या मृत्यूनंतर तब्बल सात दिवसांनी पालिकेकडे या मृत्यूची माहिती आली असून या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित खासगी रुग्णालयाला नोटीस बजावणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. यापैकी ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात ११३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता एकूण मृतांचा आकडा ३ हजार ८३० इतका झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येला आवर कसा घालायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

First Published on: June 14, 2020 8:33 AM
Exit mobile version