घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये 4 पोलीस करोनाबाधित; 37 नवे रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये 4 पोलीस करोनाबाधित; 37 नवे रुग्ण पॉझिटिव्ह

Subscribe
करोनामुक्त असलेल्या  त्र्यंबकेश्वर तालुक्यात करोनाने प्रवेश केला असून , त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासह हरसूल पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक व नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी  करोनाबाधित आढळून आले आहेत. रविवारी (दि.14) दिवसभरात 37 नवे रुग्ण पोझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 5, मालेगाव 1 आणि नाशिक ग्रामीणमधील 31 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 947 रुग्ण करोनाबाधित आहेत.
नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून शहर पोलीस दलात 3 पोलीस कर्मचारी बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यातील एक करोनामुक्त  झाला आहे. तसेच, नाशिक ग्रामीण दलात रविवारी दोन पोलीस कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनास रविवारी सांयकाळी 6 वाजता 98 रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये 37 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लाखलगाव 3, नाईकवाडी, नाशिक 1,चाटोरी 3, कोनांबे, सिन्नर 1, बिटको कॉलेज परिसर, नाशिक 1, भगूर 1, टाकळी नांदगाव 1, मनमाड 2, इगतपूरी 3, चांदोरी 1, जायखेडा 10, सटाणा 2, मालेगाव 1, देवळाली 1, निफाड 1, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे 1, हरसूल पोलीस ठाणे 1, वावी 1, नाशिक 2 रुग्णांचा समावेश आहे.
जायकखेड्यात 11 रुग्ण पॉझिटिव्ह
जून महिन्यात जायखेड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने
वाढत आहे. रविवारी (दि.१४) पुन्हा सटाणा शहरात २ तर जायखेडा येथे १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १ महिलाचा समावेश आहे. तर १० तरुणांचा समावेश आहे. यात सर्व २९ ते ३२ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. हे १० पॉझिटिव्ह मयत वाहनचालकाचे मित्र आहेत. त्यामुळे जायखेडावासियांची चिंता वाढली आहे. आता जायखेड्यात ११ व तालुक्यात १४ रुग्ण आहेत. त्यापैकी १ सोमपूर, जयपूर 3,  जायखेडा 6 रुग्ण आहेत.
नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रुग्ण 1917(मृत-118)
नाशिक ग्रामीण -351(16)
नाशिक शहर-623(30)
मालेगाव-871(64)
अन्य-72(8)
बरे झालेले रुग्ण-1229
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -