घरमहाराष्ट्रVijay Shivtare : ही संधी सोडायची नाही, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारे निवडणूक लढवण्यावर...

Vijay Shivtare : ही संधी सोडायची नाही, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम

Subscribe

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी महायुतीत राहून त्यांच्याच नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. बारामती लोकसभेची जागा महायुतीत शिवसेनेला देण्यात यावी आणि त्यातही ती उमेदवारी मलाच देण्यात यावी, असा हट्टच शिवतारे यांच्याकडून करण्यात येत आहे. पण महायुतीकडून त्यांचा नावाचा विचारही करण्यात येत नसल्याने शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. याचबाबत बोलण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना त्यांच्या बंगल्यावर बोलावले. त्यांच्यामध्ये साधारणतः दीड तास चर्चा झाली. परंतु, या नंतरही शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करण्याचे सोडले नसून बारामती लोकसभेतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. (Despite meeting of CM Eknath Shinde, Vijay Shivtare is determined to contest elections)

हेही वाचा… Uday Samant : राहुल गांधींच्या भाषणानंतर उदय सामंत यांची पोस्ट, पण स्वतःच झाले ट्रोल

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये आज (ता. 18 मार्च) दीड तास चर्चा झाली. या भेटीनंतर शिवतारे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देत सांगितले की, मी मुख्यमंत्र्यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची कल्पना दिली आहे. परंतु, त्यांनी मला युतीधर्म पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युतीधर्म पाळावाच लागेल. अजित पवार हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभावाचे धनी नको व्हायला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

तर, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना बारामतीतील गणितं समजावून सांगितली, त्यामुळे निश्चितपणे चांगला रिझल्ट येईल. मी त्यांना एवढेही सांगितले की, अजित पवार निवडून येणार नाहीत. मी जरी उमेदवार नसलो तरी अजित पवारांचा पराभव होईल. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बारामतीच्या निवडणुकीवरून आपण युतीधर्म पाळला पाहिजे, आपण युतीमध्ये आहोत. त्यांचे जे काही होईल ते आपसात होईल, त्यामध्ये आपण पडायला नको. ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावाही शिवतारेंनी केला आहे.

- Advertisement -

दोन-तीन दिवसानंतर माझी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. लोकांशी चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल. तसेच, आता आलेली ही संधी मला सोडायची नाही. जनता जे सांगेल ते मी करणार आहे. मी जरी लढलो नाही तरी अजित पवार निवडून येणार नाहीत, हे मी त्यांना सांगितले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध सामान्य जनता असा लढा आहे. मी 4-5 दिवसांत लोकांशी चर्चा करून निर्णय घेतो. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही. मात्र त्याचबरोबर जनतेचा शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे. बारामतीतील जनता पवारांच्या जाचाला त्रासली आहेत. पण सध्या माझीही तब्येत बरी नाही. त्यामुळे मी दोन दिवस इथे उपचार घेऊन त्यानंतर पुण्याला जाणार आहे. तिथे गेल्यावर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार आहे, असे सांगत शिवतारेंनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -