घरताज्या घडामोडीMulund Fire : मुलुंड येथे व्यावसायिक इमारतीमध्ये आग; ५० जण बचावले

Mulund Fire : मुलुंड येथे व्यावसायिक इमारतीमध्ये आग; ५० जण बचावले

Subscribe

मुलुंड येथील एका सहा मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली आहे. मंगळवारी सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. नियमीत कामकाज सुरू असताना आग लागली. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही.

मुंबई : मुलुंड येथील एका सहा मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली आहे. मंगळवारी सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. नियमीत कामकाज सुरू असताना आग लागली. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही. जवळपास 50 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देम्यात आली आहे. (Fire in commercial building at Mulund 50 people safe in this incident)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड (पश्चिम), एल.बी. एस.मार्ग, अविअर कॉर्पोरेट पार्क या तळमजला अधिक सहा मजली असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. मंगळवारी सकाळी 9.15 वाजता कामकाज सुरू असताना अचानकपणे ही आग लागल्याची घटना घडली. अचानक आग लागल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे एकच खळबळ माजली.

- Advertisement -

ज्यावेळी आग लागली त्यावेळी सहाव्या मजल्या 50 जण अडकले होते. त्यानंतर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. एकीकडे अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे या आगी अडकलेल्या 50 जणांना इमारतीच्या जिन्याचा आणि अग्निशमन दलाच्या शिडीचा वापर करून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे इमारतीमधून बाहेर आलेल्या नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, या आगीच्या घटनेत कोणालाही दुखपत झालेली नाही. परंतू, मोठ्याप्रमाणात इमारतीचे नुकसान झाले. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, एसी, लाकडी फर्निचर, ऑफिस रेकॉर्ड आदी सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या 4 फायर इंजिन, 2 जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझवण्यात आली. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

- Advertisement -

हेही वाचा – Weather Update: उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा; राज्यात ‘या’ भागांत पावसाची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -