भारतीय पदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रत्येक घरात सकाळची सुरुवात साखरेचा चहा किंवा कॉफी पिऊन होते. परंतु तुम्हाला माहित आहे का की, सतत साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक मानलं जातं. याचे सतत जास्त प्रमाणात सेवन केल्याने मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. इतकचं नव्हे तर यामुळे दात देखील खराब होऊ शकतात.
साखर दातांसाठी हानिकारक
- साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दात किडन्याची अधिक शक्यता असते. जेव्हा आपण साखरेपासून तयार केलेले पदार्थ खातो तेव्हा तोंडीतील बॅक्टेरिया दातांमध्ये अॅसिड तयार करतात. ज्यामुळे जास्त लवकर किडतात आणि कमकुवत होतात.
- साखरेचे सेवन केल्याने तोंडामध्ये बॅक्टेरिया वाढतात ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी देखील येऊ शकते. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर दात स्वच्छ धुवावे.
- सतत गोड पदार्थ खाल्याने दात पिवळे होण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे अनेकदा तोंड येण्याची समस्या देखील उद्भवते.
- दातांच्या अनेक समस्यांचे मूळ कारण आहार आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही जास्त साखर वापरता तेव्हा त्याचा दातांवर आणि एकूणच तोंडाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे साखरेचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य आहे. शिवाय साखरेचे आपल्या आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो.
उपाय
- साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी प्या.
- रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा म्हणजे दात किडन्याची समस्या निर्माण होत आहे.
- केक, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक, चहा, कॉफीचे कमी सेवन करा.
हेही वाचा :