घरमुंबईMumbai Rain : मनपा आयुक्त चहल उतरले रस्त्यावर, पावसाळी उपाययोजनांची केली पाहाणी

Mumbai Rain : मनपा आयुक्त चहल उतरले रस्त्यावर, पावसाळी उपाययोजनांची केली पाहाणी

Subscribe

मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शहरांत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आज मुंबईच्या रस्त्यावर उतरून पावसाळी उपाययोजनांची पाहणी केली.

मुंबई : आज (ता. 28 जून) सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शहरांत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. अंधेरी मिलन सब-वे मध्ये पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या रस्त्यावरील वाहतूक एसव्ही रोड येथून वळवली आहे. पण याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज मुंबईच्या रस्त्यावर उतरून पावसाळी उपाययोजनांची पाहणी केली. तर मुंबईत साचणाऱ्या पाण्याबद्दल चहल यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Municipal commissioner Chahal inspected the monsoon measures)

हेही वाचा – Monsoon 2023 : मुंबई-ठाण्यासह 9 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

- Advertisement -

मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी पुलावर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची सर्व नालेसफाईची काम पूर्ण केली आहेत. 114 टक्के काम आम्ही पूर्ण केलेत. शनिवारी जो पहिला पाऊस पडला, ज्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरले होते. त्यामध्ये कमी वेळात अधिकचा पाऊस पडला आणि त्यात सखल भागात पाणी साचले.

तसेच सखल भागात पाणी साचणार पण ते कमी वेळात निचरा कसा करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अंधेरी सबवे असेल किंवा इतर खोलगट भाग असेल या ठिकाणी पाणी साचू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. अंधेरी सबवे येथे जास्त पडलेल्या पावसामुळे पाणी साचले तर तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. मात्र गोखले ब्रिज बंद असल्यामुळे अंधेरी सबवे बंद करता येत नाही. पण खूपच पाणी साचले असल्याने आता तो रस्ता देखील बंद करण्यात आल्याचे चहल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

मी सर्व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे की, जिथे पाणी साचलेले असेल तिथे फिल्डवर उतरून काम करा. जवळपास एक लाख मुंबई महापालिकेचे कर्मचारी यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे मुंबईत मुसळधार पावसामुळे पाणी साचले तरी तातडीने निचरा कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. अंधेरी सबवेचा प्रश्न मोगरा पंपिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर मिटेल, अशी माहिती देखील चहल यांच्याकडून देण्यात आली आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -