घरदेश-विदेशPolitics : भाजपात नेमके जाणार तरी कोण, कमलनाथ की नकुलनाथ? चर्चा थांबता...

Politics : भाजपात नेमके जाणार तरी कोण, कमलनाथ की नकुलनाथ? चर्चा थांबता थांबेना

Subscribe

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बडे नेते कमलनाथ काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगते आहे. वास्तविक, ज्या दिवशी कमलनाथ यांची चर्चा सुरू झाली, त्यादिवशी नकुलनाथ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला. चर्चा मात्र, कमलनाथ यांची रंगली. कमलनाथ पक्षनेतृत्वावर नाराज असून त्यातूनच त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू होती. आता कमलनाथ यांची चर्चा मागे पडली असून त्यांचा मुलगा नकुलनाथ हे भाजपात जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नेमकी चर्चा काय?

दोन दिवसांपूर्वी जेव्हा ही चर्चा सुरू झाली, त्यादिवशी संध्याकाळी कमलनाथ यांनी याबाबत आपले मौन सोडले होते. असं काही असेल, माझं ठरलं की पहिल्यांदा माध्यमांना सांगेन, अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी तेव्हा दिली होती. यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आलं. मात्र, मध्य प्रदेश काँग्रेसकडून हे दावे फेटाळण्यात आले असून कमलनाथ काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray : …मग पाच वर्ष निवडणूक आयोग काय करतो? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

काँग्रेसचे म्हणणे काय?

“हा कमलनाथ यांच्याविरोधातील कट आहे. मी त्यांच्याशी स्वत: बोललो असून त्यांनी सांगितलंय की ते काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधील आहेत. ते काँग्रेसमध्येच राहतील. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा कमलनाथ स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण देतील”, असा खुलासा मध्य प्रदश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी केला आहे. “भाजपा एखाद्याच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी कशाप्रकारे माध्यमांचा वापर करते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या सगळ्या चर्चा म्हणजे त्यांच्याविरोधातील कारस्थानं आहेत”, असंही जितू पटवारी यांनी नमूद केलं.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray group : विश्वगुरू ‘या’प्रकरणी गप्प आहेत, ठाकरे गटाकडून मोदींवर शरसंधान

कमलनाथ यांच्या मुलाची चर्चा?

कमलनाथ हे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं मध्य प्रदेश काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता कमलनाथ यांचे पुत्र नकुल कमलनाथ हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगते आहे. नकुल कमलनाथ यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) खात्यावरील प्रोफाइलमध्ये बदल केला असून त्यातून ‘काँग्रेस’ हा शब्द काढण्यात आला आहे. आता नकुल कमल नाथ यांच्या प्रोफाइलवर ‘खासदार, छिंदवाडा (म.प्र.)’ एवढाच उल्लेख आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -