घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरAmbadas Danve : मी खैरेंसाठी नाही ठाकरेंसाठी काम करतो, दानवेंनी स्पष्टच सांगितले

Ambadas Danve : मी खैरेंसाठी नाही ठाकरेंसाठी काम करतो, दानवेंनी स्पष्टच सांगितले

Subscribe

दानवे आणि खैरे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. परंतु, मध्यंतरी या दोघांमध्ये सर्व काही नीट झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या दोघांमधील वाद आता पुन्हा समोर आल्याने ठाकरे गटात काही आलबेल नाही, अशा चर्चांना उधाण आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात. दोन दिवसांपूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाची देखील मला कोणतेही माहिती देण्यात आली नव्हती, असे सांगत ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. दानवे आणि खैरे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. परंतु, मध्यंतरी या दोघांमध्ये सर्व काही नीट झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या दोघांमधील वाद आता पुन्हा समोर आल्याने ठाकरे गटात काही आलबेल नाही, अशा चर्चांना उधाण आले आहे. (I am not working for Chandrakant Khair, but for Uddhav Thackeray, Ambadas Danve said clearly)

हेही वाचा… Ambadas Danve : मी नाराज नाही, पण…; लोकसभा लढवण्याची अंबादास दानवेंची इच्छा

- Advertisement -

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असलेले दानवे यांना उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे आणि तेही शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. परंतु, याबाबत आता स्वतः अंबादास दानवे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याचवेळी त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे.

प्रसार माध्यमांनी दानवेंना खैरेंबाबत विचारले असता ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात. दोन दिवसांपूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाची देखील मला कोणतेही माहिती देण्यात आली नव्हती. तर, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो न मिळो, मला मिळावी माझी मागणी आहे. मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे. पक्षाच्या विषयी संभ्रम निर्माण होऊ शकत नाही. इतर कोणताही उमेदवार दिला तर नुकसान होऊ शकतो, खैरे यांना उमेदवारी दिली तरी नुकसान होऊ शकते. आता माझ्यामुळे खैरे पडले असे त्यांनी बोलून दाखवू नये, असा खरमरीत टोला दानवेंनी लगावला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजन करून कामाला सुरुवात केली. मात्र, याबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती. मी उद्धव ठाकरे यांना सर्व काही सांगितले आहे. पक्ष प्रमुख्यांच्या कानावर काही बाबी जायला हवी आणि पक्षाने घेतली पाहिजे, असे मला वाटते आणि मुळात मी खैरेंसाठी नाही तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी काम करतो, असे टीकास्त्र अंबादास दानवे यांनी डागले. तर लोकसभेबाबत बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. अजूनही कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. तर, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी देखील इच्छुक आहे. माझी इच्छा मी यापूर्वी देखील बोलून दाखवली आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. पण कुणालाही उमेदवारी दिल्यास शिवसैनिक म्हणून त्याचे काम करेल, असेही दानवेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -