Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionHeavy Breast असेल तर असे असावे ड्रेसिंग

Heavy Breast असेल तर असे असावे ड्रेसिंग

Subscribe

प्रत्येक स्त्रीला तिची फिगर पेरफक्ट असावी असे वाटते. तिने सुंदर दिसावं अशी तिची इच्छा असते, यासाठी ती अनेक फॅशन टिप्स फॉलो करते. पण काही स्त्रियांना हेवी ब्रेस्ट मुळे आवडीचे कपडे घालताना अनेकदा विचार करावा लागतो. मग अशा स्त्रियांनी कोणते कपडे घालावे जेणे करून हेवी ब्रेस्ट असूनही त्यांना आवडीचे कपडे घालता येतील. जाणून घेऊयात काही टिप्स,

आऊटफिट कसे निवडाल
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी खरेदी करणे ही एक मोठी समस्या बनते कारण त्यांना त्यांच्या आकाराचे आणि फिटिंगचे कपडे लवकर मिळत नाहीत. तासनतास मॉल्स आणि दुकानांमध्ये फिरूनही त्यांना त्यांच्या आवडीचा ड्रेस सापडत नाही. त्यामुळे हेवी ब्रेस्ट असलेल्या स्त्रियांनी कपडे अतिशय विचारपूर्वक निवडावेत जेणेकरून हेवी ब्रेस्टमुळे तुम्हाला अन्कम्फर्टेबल वाटणार नाही.

10 Styling Tips for Heavy Breasted Women - Zig Zac Mania

हेवी ब्रेस्ट साठी योग्य ‘ब्रा’ची निवड
बहुतेक जणी हेवी ब्रेस्ट लहान दिसण्यासाठी लहान आकाराच्या ब्रा खरेदी करतात जेणेकरून त्यांचे शरीर सुडौल आणि आकर्षक दिसावे. पण यामुळे त्यांचे शरीर आकर्षक दिसण्याऐवजी खराब दिसते. त्यामुळे हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांनी ब्रा खरेदी करताना नेहमी योग्य आकाराला प्राधान्य द्यावे.

योग्य आकाराची ब्रा
जेव्हा तुम्ही ब्रा खरेदी करायला जाल तेव्हा लक्षात ठेवा की ती खूप सैल किंवा खूप घट्ट नसावी. तुम्हाला आरामदायक वाटेल त्या आकाराची ब्रा घाला जेणेकरून खराब फिटिंग ब्रा मुळे पाठ आणि खांदे दुखणार नाहीत.

हेवी ब्रेस्ट असणाऱ्या स्त्रियांनी रात्री ब्रा घालून झोपावे का?
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांनी रात्री स्पोर्ट्स ब्रा घालून झोपल्यास ब्रेस्टची हालचाल सुलभ होते तसेच तुम्ही ऑप्शन म्हणून कॅमिसोल किंवा शेपवेअर सुद्धा घालू शकतात.

योग्य फॅब्रिकची निवड
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांना लेयर्ड पॅटर्न असलेले आउटफिट्स खूप चांगले दिसतात. त्यामुळे जॅकेट, कोट यांसारखे कपडे तुम्ही घालू शकता.

हाय नेक घालणे टाळा
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांनी हाय नेक कपडे घालणे टाळा. त्याऐवजी व्ही नेक किंवा स्कूप नेक असलेली कुर्ती, टॉप किंवा ब्लाउज घालणे पसंत करा.

नूडल स्ट्रीपचे कपडे टाळा
हेवी ब्रेस्ट असलेल्या स्त्रियांनी नूडल स्ट्रीप टॉप किंवा कुर्ती घालणे टाळा. त्याऐवजी तुम्ही रुंद पट्टीचे कपडे घालू शकत. यामुळे तुमच्या शरीराच्या वरच्या भागाचा लूक बॅलन्स राहील. दुसरीकडे, जर स्लीव्ह्ज घालण्याचा मुद्दा असेल तर, थ्री-फोर्थ स्लीव्ह किंवा क्वार्टर स्लीव्ह घालणे तुमच्यासाठी चांगली कल्पना असू शकते. यामुळे तुमची हेवी बेस्ट दिसून येणार नाही.

 

- Advertisement -

हेही वाचा;

Fashion : साडीत स्लिम फिट दिसायचं ? ही स्टाईल नक्की ट्राय करा…

- Advertisement -

 

- Advertisment -

Manini