घरदेश-विदेशHindu Temple : मुस्लीम देशात आणखी एक हिंदू मंदिर; अबुधाबीनंतर 'या' ठिकाणी...

Hindu Temple : मुस्लीम देशात आणखी एक हिंदू मंदिर; अबुधाबीनंतर ‘या’ ठिकाणी बांधले जाणार

Subscribe

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. अबुधाबीमध्ये बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) मंदिर बांधले आहे. यानंतर ही संस्था आता आता आणखी एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे. आखाती देश बीएपीएस बहरीनमध्ये बीएपीएस भव्य मंदिर बांधण्याच्या तयारीत आहे. बीएपीएस गुजरातच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. (Hindu Temple Another Hindu temple in a Muslim country After Abu Dhabi will be built in Bahrain)

हेही वाचा – Maharashtra Politics : राज्यसभेची यादी पाहिल्यानंतर कीव येते; नाना पटोलेंचा महायुतीवर निशाणा

- Advertisement -

अधिकाऱ्याने सांगितले की, “बहारिनच्या राज्यकर्त्यांनी परिसरात स्वामीनारायण मंदिर बांधण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे. प्रकल्पासाठी जमीन वाटपाचे काम सुरू आहे. येत्या तीन ते चार वर्षांत आणखी एक भव्य हिंदू मंदिर बांधण्याची आम्हाला आशा आहे आणि ते पूर्ण होईल. याशिवाय ऑस्ट्रेलिया (सिडनी), दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग) आणि फ्रान्स (पॅरिस) याठिकाणी सध्या तीन मंदिरांचे बांधकाम सुरू आहे, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, आबुधाबी येथील हिंदू मंदिराचा अभिषेक आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 27 एकरांमध्ये पसरलेले हे ऐतिहासिक स्थळावर पहिले हिंदू मंदिर उभे राहिले आहे. भारतीय संस्कृती आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) ची ओळख असा एक अनोखे नाते याठिकाणी निर्माण झाले आहे. 11 फेब्रुवारी 2024 रोजी अबू धाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिरात विश्व संवादी यज्ञात 980 हून अधिक लोक जमले होते. प्राचीन धार्मिक विधी करण्यासाठी भारतातील सात पुजारी अबू धाबी येथे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Medha Kulkarni : पक्षाने पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञ – मेधा कुलकर्णी

बीएपीएसने 1,200 हून अधिक मंदिरे बांधली 

बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) स्वामीनारायण गटाने भारतात आणि परदेशात 1,200 हून अधिक मंदिरे बांधली आहेत. ही मंदिरे त्यांच्या भव्य प्रमाणात आणि स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या देशात दोन, तर परदेशात एक अक्षरधाम मंदिर आहे. गुजरातच्या गांधीनगर आणि दिल्लीत अक्षरधाम मंदिर आहे. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथील रॉबिन्सविले येथे तिसऱ्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -