Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health महिलांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी 'हे' पदार्थ आहेत उपयुक्त

महिलांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत उपयुक्त

Subscribe

आजकाल ,महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी येण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की तुमचा आहार, बदलणारी जीवनशैली आणि तणाव. अशातच डॉक्टरांच्या मते, मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैली आणि आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच मासिक पाळी दरम्यान बर्याच स्त्रियांना कमी किंवा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. अशातच अनियमित मासिक पाळी तुमच्यासाठी इतर अनेक समस्या निर्माण करू शकते. ज्यामुळे त्याचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. म्हणूनच याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अनियमित मासिक पाळीमुळे वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरुम येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

तर मग या अनियमित मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी महिलांनी नियमित खाली दिलेल्या पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे या समस्या उद्भवणार नाहीत आणि मासिक पाळीचा त्रास देखील कमी होईल.

- Advertisement -

Balanced Diet To Boost Women's Health · HealthKart

1. हळद

हळद अनेक अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. अशातच मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी तुम्हाला रोज रात्री हळदीचे दूध प्यावे लागते. तसेच जर का तुम्ही हळदीचे दूध पीत नसाल तर कोमट पाण्यासोबत हळद सेवन करू शकता. यामुळे रक्तस्त्राव सुरळीत राहील. आणि यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होतील.

2. गूळ आणि तीळ

- Advertisement -

गूळ आणि तीळ या दोन्ही पदार्थांचा प्रभाव हा उष्ण असतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्यास मासिक पाळी नियंत्रित राहते. याबरोबरच मासिक पाळी देखील नियमित राहण्यास मदत मिळते. आणि म्हणूनच यासाठी गूळ आणि तीळ यांचे रोज थोडेसे सेवन करावे.

3. पपई

मासिक पाळी अनियमित असताना पपईचे सेवन करणे आवश्यक आहे. पपई मध्ये कॅरोटीन नावाचा घटक आढळतो जो आपल्या शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन उत्तेजित करण्यास मदत करतो. तसेच पपईच्या नियमित सेवनाने तुमची मासिक पाळीची समस्या दूर होऊ शकते.

4. गाजर

गाजरात अनेक पौष्टिक घटक असतात. तसेच यामध्ये कॅरोटीन नावाचा घटक हा मुबलक प्रमाणात आढळतो. जो शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो. तसेच याच्या वापराने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.


हेही वाचा :

प्रेग्नेंसीदरम्यान महिलेला होते ब्रेनसंदर्भात समस्या

- Advertisment -

Manini