घरलाईफस्टाईलYawning : सतत जांभई येते ना? ही योगासने येतील कामी

Yawning : सतत जांभई येते ना? ही योगासने येतील कामी

Subscribe

जांभई येणे ही सामान्य बाब आहे. साधारणतः जांभई तेव्हा येते जेव्हा तुम्हाला झोप येते असे मानले जाते. पण, याव्यतिरिक्तही अनेक कारणांमुळे जांभई येऊ शकते. चारचौघात, कुठे बाहेर असताना जांभई आल्याने अवघडल्यासारखे होते. आता तर उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे. त्यामुळे अशा दिवसात आळसपणा अंगात वाढून जांभई येऊ लागते. तुमच्या याच समस्येवर मात करण्यासाठी तुम्हला काही योगासने फायदेशीर ठरू शकतात. ज्याने आळसपणा दूर होऊन संपूर्ण दिवस फ्रेश राहण्यास तुम्हाला मदत होईल.

आळसपणा दूर करण्यासाठी योगासने –

मत्स्यासन –

उंन्हाळ्यात पोटाच्या अनेक तक्रारी जाणवतात. यातील एक म्हणजे पोटात जळजळ होणे. पोटातील जळजळ होण्यासाठी आणि गॅस शांत करण्यासाठी तुम्ही मत्स्यासनचा सराव करू शकता. मत्स्यासनच्या सरावामुळे श्वसनसंस्था मजबूत होते. ज्याचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होऊन हृदयाचे ठोके नियंत्रित होतात आणि व्यक्तीला दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटते.

- Advertisement -

क्रिया –

  • शांती ठिकाणी पद्मासनाच्या मुद्रेत बसा.
  • यानंतर कंबरेखालील भाग मागे घेऊन डोके जमिनीवर टेकविण्याचा प्रयन्त करा.
  • मत्स्यासन करताना एक गोष्ट लक्षात घ्या, मत्स्यासन करताना गुडघे, नितंब आणि डोके जमिनीला टेकायला हवे.

चक्रासन –

चक्रासनाच्या सरावामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. चक्रासनामुळे मसल्सला बळकटी मिळते आणि शरीर लवचिकही होते. परिणामी, शरीरातील जडत्व कमी होऊन आळस दूर होतो. त्यामुळे तुम्हाला सतत आळसपणा आणि जांभई येत असेल तर चक्रासनाचा सराव अवश्य करावा.

- Advertisement -

क्रिया –

  • शांत ठिकाणी पाठीवर झोपावे.
  • यानंतर हळूहळू गुडघ्यात पाय वाकवून हातांच्या बोटांच्या सहाय्याने नितंब आकाशाकडे उंचावण्याचा प्रयन्त करा.
  • या पोझमध्ये तुमचे शरीर अर्धचक्राच्या स्थितीत येईल.

योगासनाप्रमाणे खालील गोष्टीही महत्वाच्या –

  • उन्हाळ्यात घनपदार्थांऐवजी द्रवपदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात सेवन करावे.
  • उन्हाळ्यात तुम्ही जे काही खाता ते पचण्यायोग्य आहे का नाही याची खात्री करा. जेणेकरून याचा तुम्हाला त्रास होणार नाही.
  • तुमचे दिवसाचे रुटीन फिक्स असुद्या. यात तुमच्या सकाळच्या उठण्याची वेळ आणि रात्री झोपण्याची वेळ निश्चित असायला हवी.
  • रात्री जागरण करणे टाळा. अनेकजणांना रात्री जागे राहून सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. अशी सवय तुम्हालाही असेल तर हे सर्वात आधी बंद करा.
  • रात्री तुम्ही पूर्ण झोप झाल्यास तुम्हाला दिवसा आळसपणा येणार नाही आणि जांभईची समस्या सतावणार नाही.
  • खोल श्वासोच्छवासाची प्रॅक्टिस करा. याने सुद्धा जांभई येणे कमी होण्यास मदत होते.

 

 

 


हेही पहा : Health : आता विसरभोळेपणाला म्हणा बाय बाय !

Edited By – chaitali Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -