घरलाईफस्टाईलसेक्सबदद्ल पालकांनी मुलांशी साधावा मोकळा संवाद

सेक्सबदद्ल पालकांनी मुलांशी साधावा मोकळा संवाद

Subscribe

‘सेक्स’ हा शब्द जरी कानावर पडला तरी सगळ्यांच्या नजरा तो शब्द उच्चारणाऱ्या व्यक्तीकडे हमखास वळतात.याला कारण की आपल्याकडे सेक्सबद्दल उघड उघड बोलण्यास अलिखित बंदीच आहे. कारण हा विषय पडद्याआडचा असल्याने लज्जा, समाजभान अशी लेबल लावून या विषयावर जाहीरपणे बोलणं टाळलं जातं.यामुळेच आपल्या समाजात सेक्स विषयी अज्ञान आहे. या अज्ञानामुळेच आजची पिढी उत्सुकतेपोटी पॉर्नकडे वळली असून त्यातून मिळणाऱ्या अर्धवट ज्ञानातून रस्ता भरकटत आहे. यातून काहीजण चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांचे आयुष्य उध्वस्त झाले आहेत.

- Advertisement -

भारतातील बहुतेक पालकांना सेक्स सारख्या विषयांवर बोलणे विचित्र आणि अस्वस्थ वाटते आणि ते शैक्षणिक संस्थांवर जबाबदारी टाकतात.पण खरं तर मुलाचे पहिले शिक्षक हे त्याचे पालक असतात, ज्यांच्याद्वारे तो जीवनातील अनेक बारकावे शिकतो.यामुळे पाश्चिमात्य देशांप्रमाणेच आपल्याकडे मुलांना घरातूनच लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी सेक्सबद्दल मुलांशी मोकळा संवाद साधायला हवा. याविषयी मुलांच्या शंकाचे निरसन करून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास मुलांना सेक्सबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाचे सामान्य ज्ञानात रुपांतर होईल.कारण सेक्स हा केवळ शारीरिक संबंध नसून व्यक्तीच्या जीवनातील एक विशेष अनुभव आहे.

सोशल मीडिया

- Advertisement -

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर ॲडल्ट कंटेंट सहज उपलब्ध आहे. यामुळे मुलं त्यातून ज्ञान मिळवताना दिसतात.बऱ्याचवेळा यातील माहिती अर्धवट असते त्यामुळे मुलांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास मनस्ताप होतो. यासाठी मुलांना याबाबत योग्य माहिती देऊन जागरूक करणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुलाला त्याच्या वयानुसार लिंगसंबंधित योग्य शिक्षण दिले पाहिजे.

बालक पालक संवाद

पालकांबरोबर संवादामुळे मूल पौगंडावस्थेत होणारे शारीरिक आणि भावनिक बदल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल. तुम्ही केलेल्या मोकळ्या संवादातून मुल सेक्स आणि रिलेशनशिपसारख्या गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळू शकतील.

तसेच भविष्यात त्याला जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आणि त्याच्या किंवा तिच्या गरजा आणि इच्छा समजून घेणे सोपे होईल. अशा प्रकारे तो भविष्यात एक निरोगी नाते टिकवून ठेवण्यास सक्षम असेल.

योग्य माहितीमुळे मुलाला त्याच्या नातेसंबंधांबद्दल योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल. जेणेकरून भविष्यात ते तुमच्याशी त्यांच्या सर्व समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलू शकतील.

गुड टच बॅड टच

पालकांबरोबर लैंगिक आरोग्यावर चर्चा केल्याने मुलाचे कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारापासून संरक्षण होऊ शकते. त्यांना गुड टच बॅड टच ,मर्यादा आणि संमती याबद्दल शिकवून, तुम्ही त्यांना भविष्यात शारीरिक आणि मानसिक विकासासाठी तयार करता. लैंगिक आरोग्य संभाषणांमध्ये पुनरुत्पादन, गर्भधारणा, गर्भनिरोधकाबद्दलही मुलांना सांगावे. यामुळे मुलाला त्याच्या शरीराबद्दल अधिक जागरूकता येते.

सेक्स संवेदना

अनेक पालकांना भीती वाटते की जर त्यांनी आपल्या मुलांना लैंगिक आरोग्याविषयी माहिती दिली तर ते लहान वयातच लैंगिकदृष्ट्या सक्रिय होऊ शकतात. परंतु संशोधनात असे सिद्ध झाले आहे की ज्या मुलांना लहान वयातच लैंगिक आरोग्यासंबंधी योग्य माहिती मिळते, त्यांच्या लैंगिक क्रियामध्ये सहभागी होण्याचे प्रमाण कमी असते. याद्वारे, मूल लैंगिक आरोग्याविषयी संवेदनशील आणि मुक्त वृत्ती बनते. तो नातेसंबंधातील गुंतागुंत समजून घेतो आणि त्यांना व्यवस्थित हाताळू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -