घरमनोरंजनTimes Square वर झळकले सिद्धू मुसेवालाच्या भावाचे फोटो

Times Square वर झळकले सिद्धू मुसेवालाच्या भावाचे फोटो

Subscribe

दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू अर्थात सिधू मुसेवाला (Sidhu Moosewala) याच्या आईने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सिद्धू मूसेवालाच्या आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या आईने IVF द्वारे दिला मुलाला जन्म दिला. सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलाचं नाव शुभदीप ठेवलं आहे. दिवंगत भाऊ सिद्धू मुसेवालाच्या स्मरणार्थ या नवजात मुलाचं नाव शुभदीप सिंह सिद्धू असं ठेवलं आहे. नुकतंच बलकौर सिंह, शुभदीप आणि सिद्धू मुसेवाला यांचे फोटो टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्कवर दाखवण्यात आले.

एका चाहत्याने Times Square वर आलेल्या सिद्धू मुसेवाला आणि त्याच्या नवजात भावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे “सिद्धूसाठी मोठा क्षण आहे. त्याचे वडील आणि नवजात बाळाचा फोटो न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकत आहे”, असं कॅप्शन त्या पोस्टला दिलं आहे. या व्हिडीओत सिद्धू मुसेवालाच्या लहानपणीचे फोटो दाखवले आहेत. त्याचबरोबर त्याच्या वडिलांचे आणि बाळ शुभदीपचे फोटोसुद्धा दाखवले आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ludhiana Live (@ludhianalive)

- Advertisement -

 या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत हा अतिशय खास क्षण असल्याचं म्हटलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत टाइम्स स्क्वेअरवर मोठा क्षण, तर एकाने मूसेवाला पुन्हा आल्याने म्हटलंय. काही चाहत्यांनी सिद्धू मुसेवालाच्या नुकत्याच जन्मलेल्या भावाला भाग्यवान म्हटलं आहे. तर “स्टार म्हणून जन्माला आलेला शुभदीप आमच्या पंजाबचा अभिमान आहे”, अशाप्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.

सिद्धू मुसेवालाचं निधन

29 मे 2022 रोजी मनसामध्ये सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सिद्धू मुसेवाला 28 वर्षांचा होता. त्याला गोळ्या झाडल्यानंतर लेगच मनसा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हल्लेखोरांनी त्याच्यावर 30 हून अधिक राऊंड गोळ्या झाडल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -