Tuesday, May 21, 2024
घरमानिनीHealthस्ट्रेसमुळे वाढतो मसल्सवरील ताण, अशी मिळवा सुटका

स्ट्रेसमुळे वाढतो मसल्सवरील ताण, अशी मिळवा सुटका

Subscribe

बदलत्या काळात स्ट्रेस ही सामान्य समस्या बनली आहे. त्याच बरोबर ही समस्या जास्त करून तरुणांमध्ये दिसून येते. चिंतेची बाब म्हणजे स्ट्रेसचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यापुरताच मर्यदित न राहता शारीरिक आरोग्यावरही होत आहे. परिणामी, स्ट्रेसमुळे अनेक शारीरिक समस्या उदभवत आहेत. स्ट्रेसमुळे अंगदुखी आणि शरीरात ताठरता अशा तक्रारी जाणवत आहेत तसेच स्ट्रेसमुले मसल्सवरील ताण हा जास्त प्रमाणात वाढण्याच्या तक्रार जाणवत आहे.

स्ट्रेस आणि अंगदुखीचा आहे खोलवर संबंध – जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, तेव्हा मसल्सवरही ताण जाणवतो. स्ट्रेसमुळे शरीराचे मसल्स तणावग्रस्त होतात. ज्याने अंगदुखी समस्या प्रकर्षाने जाणवते.

- Advertisement -

उपाय काय कराल –

चालणे –
स्ट्रेसमुळे शरीरात ताठरता जाणवते. त्यामुळे स्वतःला सक्रिय ठेवण्याचा प्रयन्त करा आणि थोडा वेळ चालत राहा. मोकळ्या वातावरणात फिरायला जा. यामुळे तुमचे लक्ष स्ट्रेसपासून विचलित होईल आणि तुम्हाला आराम मिळेल. स्ट्रेस कमी होताच मसल्स रिलीझ होण्यास मदत मिळते. अशाने ताठरतेची समस्येपासून सुटका मिळेल.

- Advertisement -

ध्यान आणि योगा –
ध्यान आणि योगा अशा दोन क्रिया अशा आहेत ज्या आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील वेदना आणि मसल्सरवरील ताण कमी करायचा असेल तर आधी तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मेडिटेशन अशावेळी तुम्हला मदत करू शकेल. त्याचबरोबर योगामुळे ताणही कमी होतो

मालिश करा –
जर तुम्ही स्ट्रेसच्या समस्येने हैराण झाले असाल तर शरीराची मालिश करू शकता. शरीराच्या मालिशने तुम्हाला बराच फरक जाणवेल. कोणाकडून मसाज करून घेणे शक्य नसल्यास तुम्ही स्वतः तुमच्या पायांना आणि गुडघ्यांना मसाज करू शकता.

पुरेशी झोप घ्या –
स्ट्रेसफुल आयुष्यात, अनेकजणांना पुरेशी झोप मिळत नाही. ज्याने मेंदू आणि मसल्सवर ताण येतो. ज्यामुळे शरीरात वेदना होतात आणि मसल्स कडक होतात. अशावेळी ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमची झोप तुम्हला मदत करू शकते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा प्रयन्त करा.

 

 


हेही वाचा :  थकवा दूर करण्यासाठी ऊसाचा रस पिणं फायदेशीर

 

- Advertisment -

Manini