Tuesday, May 21, 2024
घरमानिनीHealthजिभेचा रंग सांगतो तुमचे आरोग्य

जिभेचा रंग सांगतो तुमचे आरोग्य

Subscribe

मानवाचे शरीर एक उत्कृष्ट स्वयंचलित मशिन आहे. ज्यामध्ये सर्व अवयव पद्धतीशीरपणे कार्य करतात. अशा स्थितीत कोणत्याही अवयवातील थोडासा दोषही संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडू शकतो. कोणत्याही आजाराने ग्रासले की, शरीर स्वतःच त्याबद्दलचे संकेत देऊ लागतो. त्याचा परिणाम शरीराच्या बाह्य भागांवर स्पष्टपणे दिसून येतो, जसे की, जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल हे आरोग्याची स्थिती बऱ्याच प्रमाणात सूचित करतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील विषारी घटकांमुळे जिभेचा रंग बदलतो. अशा विशिष्ट आजारात जिभेवर एक थर साचतो आणि त्याचा रंग बदलतो. अशाप्रकारे जिभेच्या रंगात होणारा बदल पाहून शरीराच्या अंतर्गत समस्यांचा बऱ्याच अंशी अंदाज लावता जातो. जिभेतील बदल आणि त्यांची चिन्हे याबद्दल सविस्तरपणे समजून घेऊयात,

- Advertisement -

काळी जीभ – मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून काळी जीभ म्हणजे आरोग्यासाठी धोक्याचे संकेत. खरं तर, जीभ काळी पडणे हे केवळ एकाच नाही तर अनेक आजारांना सूचित करते. हे डायबिटिसपासून अल्सर आणि कॅन्सरपर्यतच्या प्राणघातक आजारांचे लक्षण असू शकते. याशिवाय तोंडात बॅक्टरीया वाढल्यामुळे जीभ सामान्य रंगापेक्षा गडद दिसू लागते. त्यामुळे जिभेचा काळेपणा कधीही हलक्यात घेऊ नये.

निळी जीभ – जीभ निळी पडणे हे देखील आरोग्यासाठी धोकादायक लक्षण आहे. खरं तर, निळी जीभ हृदयाशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदयाच्या समस्यांमुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन विस्कळीत होते, तेव्हा जिभेचा रंग निळा होतो. म्हणून, जर तुम्हाला तुमची जीभ निळी पडताना दिसली, तर स्वतःची शारीरिक तपासणी अवश्य करा.

- Advertisement -

जिभेवर पांढरा थर – जिभेवर अनेकदा पांढरा थर जमा होतो. ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात. पण, प्रत्यक्षात जिभेवर पांढरा थर जमा होणे हे पचनाच्या समस्यांचे लक्षण असू शकते. याशिवाय शरीरात कफ वाढल्यास जिभेवर पांढरा थर जमा होऊ लागतो.

जिभेवर पिवळा थर – जीभ पिवळी पडणे हे देखील आरोग्याच्या समस्यांचे लक्षण आहे. कावीळमध्ये जिभेवर पिवळसरपणा स्पष्टपणे दिसून येतो, तर शरीरच्या रक्ताच्या कमतरतेमुळे जिभेवर पिवळा थर दिसून येतो.

फाटलेली जीभ – काही लोकांच्या जिभेला तडे जातात, जे शरीरात संसर्गाचे लक्षण असू शकते. याशिवाय किडनी आणि डायबिटीसचा त्रास असलेल्या लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागतो.

जिभेचा लालसरपणा – जिभेचा रंग लाल होणे हे देखील गंभीर आजाराचे लक्षण आहे.वायरल फ्लू आणि तापाने ग्रस्त असताना, जिभेचा रंग अनेकदा लाल होतो.

जिभेचा हलका गुलाबी रंग हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. त्यामुळे जर तुमच्या जिभेचा रंग सामान्या रंगापेक्षा जास्त गडद किंवा फिकट होत असेल तर त्याकडे कधीही कधीही दुर्लक्ष करू नये. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क अवश्य साधा.

 

 


हेही वाचा : Health Care : जमिनीवर झोपल्याने होतील ‘हे’ आजार दूर

- Advertisment -

Manini