Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthउकडलेले अंड की ऑम्लेट खाणे फायदेशीर?

उकडलेले अंड की ऑम्लेट खाणे फायदेशीर?

Subscribe

अंड हे असे अन्न आहे, जे आपल्याला आवश्यक पोषक तत्वांनी समुद्ध करते. अंड हा एक नैसर्गिक स्रोत आहे जी आंपल्याला प्रोटिन्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स यासारखी महत्वपूर्ण पोषक तत्वे प्रदान करतो. यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते आणि हाड, स्नायू मजबूत होतात. अंड्याचे सेवन शारीरिक आणि मानसिक आरोग्यसताही फायदेशीर असते. अंडी खाल्याने आपण काही आजारांपासून दूर राहतो. पण अनेकांना असं प्रश्न पडतो की, अंडे की ऑम्लेट खाणे फायद्याचे आहे. जाणून घेऊयात, अंडी उकडलेले खाणं जास्त फायदेशीर असतात की, अंड्याचे ऑम्लेट खाणे फायदेशीर असतं हे जाणून घेऊयात,

उकडलेल्या अंड्याचे फायदे –

- Advertisement -

प्रोटिन्सचा स्रोत – उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्याने आपल्या शरीरातील स्नायू टिकून ठेवण्यास मदत होते. स्नायू मजबूत झाल्याने शारीरिक क्षमता वाढते.

ऊर्जेचा स्रोत – उकडलेले अंड एक ऊर्जेचा स्रोत आहे. जो आपल्याला संपूर्ण दिवस एनर्जी प्रदान करतो.

- Advertisement -

मेंदूचे कार्य सुधारते – अंड्यामध्ये आढळणारे कोलिन नावाचे पोषक तत्वे आपल्या मेंदूसाठी जास्त महत्वाचे असतात. याने मेंदूची शक्ती वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर – अंड्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए आणि ल्युटीन डोळ्यांचे अंतर्गत आरोग्य राखण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.

 

ऑम्लेटचे फायदे –

सहज तयार होते – ऑम्लेट बनविणे खूप सोपे असते.

प्रोटिन्स आणि पोषण मिळते – ऑम्लेटमध्ये प्रोटिन्स आणि इतर पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शारीरिक क्षमता वाढते.

चवदार – तुम्ही तुमच्या आवडत्या फ्लेवर्समध्ये ऑम्लेट बनवू शकता. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे पदार्थ त्यात टाकून ऑम्लेट फार चविष्ट बनते.

आरोग्यासाठी उपयुक्त – विविध चवींसोबत व्हिटॅमिन आणि मिनरल्स ऑम्लेटमध्ये असतात. जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

उकडलेले अंड की ऑम्लेट फायदेशीर ?

  1. ऑम्लेटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पटकन तयार होते. पण, त्यात तेल किंवा तूप वापरले जाते जे जास्त प्रमाणात हानिकारक असू शकते. त्याच वेळी उकडलेली अंडी शिजविण्यासाठी केवळ पाण्याचा वापर केला जातो. उकडलेल्या अंड्याना तेलाची गरज नसते.
  2. आपण ऑम्लेट तयार करण्यासाठी तेल वापरतो त्यामुळे शरिरातील कोलेस्ट्रोल वाढते. मात्र, उकडलेली अंडी खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  3. अनेकदा सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेकजण ऑम्लेट खातात. पण ऑम्लेटमधील तेल, मीठ, तिखट या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो.
  4. उकडलेली अंडी आणि ऑम्लेट यांचे स्वतःचे असे खास वेगवेगळे फायदे आहेत. उकडलेली अंडी अधिक पौष्टिक असतात.
  5. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनी दररोज नाश्त्यामध्ये एक तरी उकडलेले अंड खावे त्याने शरीर निरोगी राहते तसेच यामुळे मेंदू देखील तल्लख राहण्यास मदत होतो.
  6. लहान मुलांना देखील दररोज एक उकडलेल अंडे खायला द्यावे.

 

 


हेही वाचा : Banana For Health : दररोज केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini