घरक्राइमFarhatullah Ghori : अक्षरधाम हल्ल्याचा मास्टरमाईंड फरहतुल्ला गोरीची भारताविरुद्ध युद्धाची घोषणा

Farhatullah Ghori : अक्षरधाम हल्ल्याचा मास्टरमाईंड फरहतुल्ला गोरीची भारताविरुद्ध युद्धाची घोषणा

Subscribe

नवी दिल्ली : गुजरातच्या अक्षरधाममधील 2002 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी फरहतुल्ला गोरी यांनी 22 वर्षांनंतर व्हिडीओ जारी करत भारताविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. फरहतुल्ला गोरीच्या व्हिडीओने भारतीय गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे. (Akshardham attack mastermind Farhatullah Ghoris declaration of war against India)

फरहातुल्ला गोरी हा फरार दहशतवादी असून तो भारतीय एजन्सीच्या रडारवर आहे. फरहातुल्ला गोरी हा गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील 2002 च्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आहे. फरहातुल्ला गोरीने 2002 मध्ये अक्षरधाम मंदिरावर भारतात पहिला हल्ला केला होता. त्यामुळे गुजरात आणि हैद्राबाद पोलिसांना तो हवा आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या दहशतवादी फाइल्समध्येही गोरीचे नाव आहे. भारताच्या गृहमंत्रालयाने त्याला 2020 मध्ये दहशतवादी घोषित केले होते. यानंतर आता फरहातुल्ला गोरीने पुन्हा एकदा व्हिडीओ जारी करत भारताविरुद्ध विष ओकताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – One Nation-One Election : पहिल्या टप्प्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र; असे काम करेल वन नेशन, वन इलेक्शन

फरहातुल्ला गोरीचा 22 वर्षांनंतर भारताविरुद्ध युद्धाची घोषणा करणारा व्हिडीओ जारी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गेल्या वर्षी उघड केले होते की, गोरी हा इस्लामिक स्टेट रिक्रूटर म्हणून ISIS-प्रेरित मॉड्यूलच्या मागे होता. अलीकडील गुप्तचर अहवाल सूचित करतात की, भारतात अनेक दहशतवादी सेल उघडकीस आले आहेत. फरहातुल्ला गोरी या ऑपरेशनमध्ये प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आला आहे. गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरी यापैकी अनेक मॉड्यूलचा हँडलर म्हणून ओळखला जातो. गोरीचा लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांशी संबंध आहे.

- Advertisement -

दरम्यान, भारताच्या गृहमंत्रालयाने 2020 दहशतवादी म्हणून घोषित केले असूनही गोरी लाहोरमधून गुप्तपणे काम करत आहे. गोरीसारख्या दहशतवाद्यांचा भारतीय एजन्सी जेव्हा तपास करतात आणि पाकिस्तानला त्यांच्याविरुद्ध विचारतात, तेव्हा पाकिस्तान माहिती देत नसल्याचा इतिहास आहे. दहशतवादी पाकिस्तानी नागरिक नसून भारताचा रहिवासी आहे, असे सांगून ते जबाबदारी फेटाळताना दिसतात.

हेही वाचा – Ranji Trophy Final : मुंबईकडे 8 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी तर 42व्यांदा पटकावले जेतेपद 

फरहातुल्ला गोरी कोण?

फरहातुल्ला गोरी हा इस्लामिक स्टेटपासून प्रेरित दहशतवादी मॉड्यूल चालवत होता. ज्याबाबत गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने खुलासा केला होता. तो आयएससाठी रिक्रुटर म्हणून काम करत होता. फरहातुल्ला गोरीला अबू सुफियान, सरदार साहेब आणि फारुख या नावानेही ओळखले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -