Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : होममेड चिकन सँडविच

Recipe : होममेड चिकन सँडविच

Subscribe

चिकन सँडविच हे आपण सगळ्यांनीच बाहेर खाल्ले असेल. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत अनेकांना सँडविच चिकन ही डिश खूप आवडते. अशातच आता ही डिश बाहेर न खाता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने होममेड चिकन सँडविच घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकता. तसेच आता आपण होममेड चिकन सँडविचला काय साहित्य लागणार ते पाहूया…

साहित्य

  • 1 कप चिकन, उकडलेले
  • 1 टीस्पून मेयोनीस
  • 1 टीस्पून काळी मिरी
  • 2 ब्रेडचे तुकडे
  • 1 शिमला मिरची
  • 1 लेट्यूस पाने

Chicken Mayo Sandwich - Mrs Jones's Kitchen

कृती

  • एका भांड्यात उकडलेले चिकनचे तुकडे वेगळे करा.
  • आता मेयोनीस आणि काळी मिरी त्यात घाला. आणि हे मिश्रण चांगले मिसळा.
  • यानंतर एक ब्रेड घ्या आणि त्यावर हे मिश्रण नीट लावून घ्या.
  • हे झाल्यावर लेट्युसची पाने आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्या.
  • आता ब्रेडला लावलेल्या चिकनच्या मिश्रणावर हे व्हेजिटेबल्सचे मिश्रण लावा.
  • वर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवा आणि त्याचे दोन भाग करा.
  • आता हे चिकन सँडविच हिरव्या कोथिंबीर चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा : Recipe : ब्रेड बटाटा चीज बॉल्स

- Advertisment -

Manini