Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthSalad : सॅलड जेवणाआधी की नंतर खायचे?

Salad : सॅलड जेवणाआधी की नंतर खायचे?

Subscribe

सॅलेड खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. हे आपल्या सर्वानाच माहिती आहे. पण ते केव्हा आणि कधी खावे? याबाबत अनेकांचा आजही संभ्रम आहे. सॅलेड शरीरासाठी उपयुक्त असले तरी सॅलड खाण्याची एक विशिष्ट वेळ आहे त्यानुसार आपण सॅलेड खायला हवे तरच त्याचा शरीरासाठी फायदा होऊ शकतो. जेणेकरून त्यातील संपूर्ण पौष्टीक घटक शरीराला मिळतात . जाणून घेऊयात, सॅलड कसे आणि केव्हा खावे.

सॅलेड शरीरासाठी महत्वाचं का?

- Advertisement -

सॅलडचे सेवन शरीरासाठी गरजेचे असते, त्याद्वारे आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा शरीराला सहज होतो. असे असले तरी सॅलेड योग्य प्रकारे खाणेही तितकेच महत्वाचे आहे. सॅलेड कच्या स्वरूपात खाल्ले जाते आणि आपल्या जेवणातील पदार्थ आपण शिजवून खातो. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते, कच्चे सॅलेड आणि शिजवलेले पदार्थ एकत्र खाल्यास पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेवणापूर्वी सॅलेडचे सेवन केल्यास उत्तम . जर जेवणापूर्वी तुम्ही सॅलेडच सेवन केल्यास तुमचे पोट मोठ्या प्रमाणात भरते आणि तुमची अतिरिक्त भूक लागण्याची तीव्रता कमी होते. परिणामी, तुम्ही जास्त खाणे टाळता. ज्याने तुमचे वजन नियंत्रीत राहते.

सॅलेड खाण्याची सर्वोत्तम वेळ –

- Advertisement -

जर आपण सॅलेड खाण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल विचार करत असाल तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसा सॅलेड खाणे केव्हाही उत्तम. वास्तविक, सकाळी आणि दिवसा शरीरात पाचक एन्झाइम्स योग्यरीत्या तयार होतात आणि अशा परिस्थितीत ते सॅलेडच्या पचनास मदत करतात. पाचक एन्झाइम्सचे उत्पादन रात्री सकाळच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे जेव्हा आपण रात्री सॅलेड खातो तेव्हा ते पचन करण्यासाठी पचनसंस्थेला अधिक मेहनत करावी लागते. परिणामी,शरीराचे पचन बिघडते. याकारणे पोटात गॅस होणे आणि पोट दुखण्याची समस्या जाणवते. त्यामुळे दिवसा सॅलेडचे सेवन करणे कधीही चांगले राहील जेणेकरून ते सहज पचते आणि शरीराल त्याचा पुरेपूर फायदा होतो.

 

 

 


हेही पहा : Health Tips : Junk Foodचे व्यसन कसे कमी कराल?

 

 

- Advertisment -

Manini