Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship Relationship.... टॉक्सिक आणि केअरिंग पार्टनरमध्ये असतो 'हा' फरक

Relationship…. टॉक्सिक आणि केअरिंग पार्टनरमध्ये असतो ‘हा’ फरक

Subscribe

तुम्ही रिलेशनशीपमध्ये (relationship) तुमचा पार्टनर हा टॉक्सिक आणि केअरिंग पार्टनर हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जेणे करून तुम्हाला हे नाते पुढी पत्नी-पतीच्या रुपात पाहू शकता की, या रिलेशनशीपमधून बाहेर पडले पाहिजे, या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

दरम्यान, तुमचा पार्टनर टॉक्सिक असेल, यासंदर्भात तुम्ही तुमच्या पार्टनरच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर त्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नाहीत. कारण, आज काल आपण सर्वजण  रिलेशनशीपबद्दल ऐकतोय. नुकतेच दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हदरुन सोडले आहे. यात श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला तिची निर्घृण हत्या केली. यात आफताब हा संशय होता. तो श्रद्धाचे मित्र-मैत्रीण यांच्यावर संशय घेत होता. यातून आफताबने श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली. या केससंदर्भात नवनवीन खुलासे होत आहेत. यामुळे तुम्हाला तुमचा पार्टनर हा टॉक्सिक आणि केअरिंग हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

 जाणून घ्या आहे काय फरक 

टॉक्सिक रिलेशनशिप हे तुमचे आयुष्य खराब करते. तुम्हाला हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की, तुमच्या पार्टननर टॉक्सिक की केअरिंग आहे, कारण टॉक्सिक रिलेशनशिप तुमच्ये आयुष्य खराब करू शकते. या टॉक्सिक रिलेशनशिपडे पडसाद तुमच्या भविष्यावर देखील पडू शकतात. त्यामुळे या रिलेशनशीपमधून बाहेर येणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

रिलेशनशिप दररोज धक्कादायक माहिती 

- Advertisement -

आज काल रिलेशनशिपसंदर्भातील हृदयद्रावक केसेस समोर येत आहेत. ज्यात टॉक्सिक पार्टनर कोणत्या तरी संशय किंवा वादावरून आपल्या पार्टनरची जीव घेतात.  उदा. आफताब अमीन पूनावाला याने वसईची (मुंबई) श्रद्धा वालकर हिची गळा आवळून हत्या केली.

पार्टनरला ओळखने गरजेचे 

तुमचा पार्टनर कसा आहे हे तुम्हाला ओळखणे गरजेचे आहे. कारण, तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिप असा की, तुमच्या पार्टनरच्या काही टॉक्सिक गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळेच
टॉक्सिक रिलेशनशिप ओळखने खूप गरजेचे आहे. यामुळे तुम्ही भविष्यातील धोका आधीच ओळखू शकतो.

नात्या संशय असणे

तुमचा पार्टनर तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींच्या नात्याबद्दल संशय घेत असेल तर, तुमच्या प्रत्येक गोष्टीसंदर्भातत संशय घेत असेल तर तुम्ही टॉक्सिक पार्टनरसोबत रिलेशनशीपमध्ये आहात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.

दरोरज भांडणे होणे

तुमच्या पार्टनरसोबत सतत सतत भांडण होत असतील तर तुमच्या नात्यात प्रेम राहिले नसेल. हे तुम्हाला समजले पाहिजे. या नात्यातून तुम्हाला दूर गेले पाहिजे. त्यामुळे तुम्ही या नात्याला लवकरच बॉय-बॉय करायला हवे.

रिलेशनशीपमध्ये मारहाण होणे

तुमचा पार्टनर तुम्हाला मारहाण करत असेल तर तुम्ही त्या पार्टनरसोबत न राहणे योग्य आहे. या रिलेशनशिपमध्ये मारहाणला जागा नाही. रिलेशनशिपमध्ये पार्टनरने एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते. तुम्हला मारहाण होत असेल तर ते रिलेशनशिप तुमच्यासाठी नाही, हे समजने गरजेचे आहे.


जीवे मारण्याची धमकी

तुमचा पार्टनर रागाच्या भरात तुम्हाला मारण्याची धमकी देत असेल. किंवा तुमच्याशी आक्रमक वागणत असेल, उद्धट वागत असेल तर तुमच्या नात्यात प्रेम नाही. यामुळे तुम्ही या नात्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे.

अपमान करत असेल

प्रेमात एकमेकांचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे असते. पण, तुमचा पार्टनर तुमचा अपमान करत असेल तर हे खूप वाईट आहे. यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनसंदर्भात वेळीच सावधान झालेले चांगले आहे.

तुम्हाला कंट्रोल करत असेल

तुमचा पार्टनर तुम्हाला कंट्रोल करत असेल तर तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये राहणे हे योग्य नाही.


हेही वाचा – रिलेशनशिपमध्ये येण्याआधीच जाणून घ्या ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini