घरपालघरकचरा गाड्यांच्या स्वच्छतेसाठी धुलाई यंत्राची उभारणी

कचरा गाड्यांच्या स्वच्छतेसाठी धुलाई यंत्राची उभारणी

Subscribe

यासाठी जवळपास १४० हुन अधिक लहान-मोठ्या नव्या गाड्या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी खरेदी करण्यात आल्या आहेत.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात दैनंदिन कचरा संकलन गोळा करण्यासाठी फिरत असलेल्या गाड्या स्वच्छ असाव्यात म्हणून त्या दररोज धुण्यासाठी धुलाई यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कंत्राटदाराला महापालिकेने निर्देश दिले असून अंमलबजावणी न-केल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे. मीरा- भाईंदर शहरातील कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. वार्षिक १४० कोटीच्या घरात असलेली ही निविदा पाच वर्षासाठी एकूण ७०० कोटी इतकी आहे. या कामाचे दोन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. यात प्रभाग १ ते ३ साठी ‘ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट’ व प्रभाग ४ ते ६ साठी ‘कोणार्क ‘अश्या दोन संस्थांना हे काम दिले आहे. यासाठी जवळपास १४० हुन अधिक लहान-मोठ्या नव्या गाड्या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी खरेदी करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार मागील सहा महिन्यापासून हे काम दैनंदिन रित्या होत आहे.मात्र अजूनही नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करत नसल्यामुळे ही वाहने लवकर खराब होऊ लागली आहे. परिणामी ही वाहने उभी केल्यानंतर त्यामधून दुर्गंधी पसरते. त्यात ‘कोणार्क’ला गाड्या उभ्या करण्यासाठी महापालिकेने मीरा रोडच्या रामदेव पार्क येथील भर वस्तीतील जागा उपलब्ध करून दिली आहे. तर ग्लोबल वेस्ट साठी अजूनही जागा मिळत नसल्यामुळे त्या गाड्या रस्त्याच्याकडेला उभ्या राहत आहेत. त्यामुळे गाड्यातील दुर्गंधी दूर करण्यासाठी आता महापालिकेने स्वतंत्र धुलाई यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा उभारण्याचे काम कंत्राटदरणमार्फतच केले जाणार आहे. आधुनिकरित्या पाणी मारण्याच्या यंत्राने गाड्याची स्वच्छता झाल्यास त्या दीर्घ काळ टिकणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
“सध्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची पारंपरिक पद्धतीने स्वच्छता केली जात आहे. मात्र यामुळे गाड्यांमध्ये चिकटलेला कचरा निघत नाही आणि दुर्गंधी पसरते. यावर उपाय म्हणून ही वाहने उभी करणाऱ्या स्थळीच आधुनिक धुलाई यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
– रवी पवार, उपायुक्त घनकचरा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -