Friday, May 3, 2024
घरमानिनीजगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्ध क्षेत्रात तैनात झालेली कॅप्टन शिवा चौहान कोण?

जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्ध क्षेत्रात तैनात झालेली कॅप्टन शिवा चौहान कोण?

Subscribe
  • चंदा मांडवकर 

आजच्या काळात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अशातच भारताच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने देशातील तरुणी, महिला या सैन्यात सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या फायर अॅन्ड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान ही कुमार पोस्ट मध्ये तैनात झालेली पहिली महिला अधिकारी ठरली आहे. परिश्रम, मेहनत आणि कठीण प्रशिक्षणानंतर तिची येथे पोस्टिंग करण्यात आलेली आहे. तर कॅप्टन शिवा चौहान (Captain Shiva Chauhan) नक्की कोण आणि तिच्या येथवरच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊयात.

वयाच्या ११ व्या वर्षी वडिलांना गमावले

- Advertisement -

राजस्थान मधील कॅप्टन शिवा चौहान एक बंगाल सॅपर अधिकारी आहे. तिने आपले शालेय शिक्षण उदयपुर येथून पूर्ण केले आणि एनजेआर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उदयपुर येथूनच सिविल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. तर वयाच्या ११ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. तिची आई ही गृहीणी आहे.

परिवाराने सैन्यात जाण्यासाठी केले प्रेरित

- Advertisement -

Captain Shiva Chauhan became first woman officer to be posted in highest  battlefield of Siachen Glacier-कैप्टन शिवा चौहान दुनिया के सबसे ऊंचे  युद्धक्षेत्र Siachen Glacier में तैनात होने वाली ...

परिवाराने नेहमीच शिवाला भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी प्रेरित केले. तिने ओटीए, चेन्नईत प्रशिक्षणादरम्यान खुप कमालीची कामगिरी केल्यानंतर तिला मे २०२१ मध्ये इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. एका वर्ष युवा सेवेतच तिने यशस्वीपूर्म नेतृत्व करुन धैर्य आणि तिचा दृढ संकल्प काय आहे हे दाखवून दिले. जुलै २०२२ रोजी कारगिल विजय दिवसाचा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारका पर्यंता सुरा सोई सायकलिंग अभियानात ५०८ किमीचे अंतर कॅप्टन शिवाने पार केले.

पुरुषांचे नेतृत्व करण्याचे घेतले आव्हान

दुनिया के सबसे खतरनाक पोस्ट पर ड्यूटी करेंगी कैप्टन शिवा चौहान | Captain  Shiva Chauhan; Siachen;s Kumar Post; Defence Minister, Women Officer of  Fire and Fury Corps; Indian Army - Dainik Bhaskar

कॅप्टन शिवाने (Captain Shiva Chauhan) जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धक्षेत्रात सुरा सोई इंजिनियर रेजिमेंटच्या पुरुषांचे नेतृत्व करण्याचे आव्हान घेतले. आपल्या उत्तम कामगिरीच्या आधारावर सियाचिन बॅटल स्कूल मध्ये प्रक्षिण घेतल्यानंतर तिची निवड करण्यात आली. तिला खुप कठीण प्रशिक्षणाला ही सामोरे जावे लागले. त्याचसोबत भारतीय सैन्यातील अधिकारी आणि सैनिकांसह ही प्रशिक्षण दिले गेले. विविध आव्हानांचा सामना करत कॅप्टन शिवाने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २ जानेवारी २०२३ रोजी तिला सियाचिन ग्लेशियर मध्ये सहभागी करुन घेण्यात आले. कॅप्टन शिवा चौहान हिच्या नेतृत्वात सॅपर्सची टीम काही युद्ध इंजिनिअरिंगच्या कामांसाठी जबाबदार असणार आहेत. त्याचसोबत तीन महिन्यांसाठी ही पोस्टिंग असणार आहे.

कुमार पोस्टवर नेहमीच ३०० सैनिक उपस्थितीत

Captain Shiva Chauhan: शिवा चौहान बनीं पहली भारतीय सैन्य अधिकारी खतरनाक  युद्धक्षेत्र सियाचिन से करेंगी देश की रक्षा - Captain shiva chauhan becomes  the first woman officer ...

सियाचिन ग्लेशियर जगातील सर्वाधिक मोठी युद्धाची रणभूमी आहे. येथे भारत आणि पाकिस्तानने १९८४ मध्ये थांबून-थांबून खुप वेळा युद्ध केले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये सियाचिन ग्लेशियरवर १५,६३२ फूट उंचीवर बनवेण्यात आलेल्या कुमार पोस्टवर पोहचण्यासाठी आठ अपंग लोकांच्या टीमने जागतिक रेकॉर्ड ब्रेक ही केला होता.

माइनस 21 वाले सियाचीन में तैनात महिला अफसर! - Indian army woman officer shiva  chauhan posted at siachen with minus 21 temperature lbsv

नौसेनेच्या ३००० अग्निवीर नौसिकांमध्ये ३४१ महिलांचा समावेश भारतीय नौसेनेत अग्निवीर योजनेअंतर्गत पहिल्यांदाच महिला नाविकांचा समावेश करण्यात आला आहे. चीफ एडमिरल आर हरि कुमार यांनी सांगितले होते की, जवळजवळ ३ हजार अग्निवीरांना नौसेनेत दाख घेण्यात आलेले आहे. यामध्ये ३४१ महिला नाविक म्हणजेच ‘वुमन-सेलर’ चा ही समावेश आहे. नौसेनेत महिलाअग्निवीरांना याच नावाने ओळखले जाईल. सैन्यात त्यांची महिला जवान’ आणि एअरफोर्समध्ये ‘एअर वुमन’ नावाने नियुक्ती केली जाईल.

 

- Advertisment -

Manini