घरदेश-विदेशTerrorist Attack: भारतीय सैन्यावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; जम्मूमधील पुंछमधील घटना

Terrorist Attack: भारतीय सैन्यावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; जम्मूमधील पुंछमधील घटना

Subscribe

भारतीय सैन्याच्या वाहनावरील हल्ल्यानंतर जम्मूच्या खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एकीकडे सुरक्षा दलांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर जम्मू खोऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह सर्व रस्त्यांवर पोलीस, लष्कर आणि एसओजीकडून नाकाबंदी करण्यात येत असून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. वाहनातून प्रवास करणाऱ्या लोकांची ओळखपत्रे तपासली जात आहेत.

नवी दिल्ली : भारतीय सैन्यावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. शुक्रवारी (12 जानेवारी) जम्मू विभागातील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केले. दहशतवाद्यांच्या या कृत्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. मात्र, सर्व दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्षा दलांनी परिसरावर ताबा घेत शोध मोहीम सुरू केली आहे. (Terrorist Attack Another terrorist attack on Indian Army Incident in Poonch in Jammu)

भारतीय सैन्याच्या वाहनावरील हल्ल्यानंतर जम्मूच्या खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एकीकडे सुरक्षा दलांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर जम्मू खोऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह सर्व रस्त्यांवर पोलीस, लष्कर आणि एसओजीकडून नाकाबंदी करण्यात येत असून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. वाहनातून प्रवास करणाऱ्या लोकांची ओळखपत्रे तपासली जात आहेत.

- Advertisement -

मागील महिन्यांतही करण्यात आला होत हल्ला

आजच्या हल्ल्याआधी भारतीय लष्करावर मागील वर्षी 21 डिसेंबर रोजी पुंछमधील बाफलियाज भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. तेथे दोघे जखमी झाले. दहशतवाद्यांनी आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर बेच्छूट गोळ्या झाडल्या. पाकिस्तान समर्थित पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने (PAFF) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

हेही वाचा : BMC : निवडणूक आयोगाची सूचना अन् मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची खांदेपालट!

- Advertisement -

आतापर्यंत 21 जवानांनी बलिदान दिले

पूंछमध्ये 29 महिन्यांतील दहशतवादी हल्ल्याची ही पाचवी मोठी घटना आहे. 2021 पासून या पाच घटनांमध्ये 21 जवानांनी बलिदान दिले आहेत. यामध्ये 11 ऑक्टोबर 2021 मध्ये चामरेड भागात शोध मोहीम राबवणाऱ्या सैनिकांवर हल्ला, जेसीओसह पाच जणांचा बळी. 20 ऑक्टोबर 2021 मध्ये भटादुरियांमध्ये शोध मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते. जम्मू-पुंछ महामार्ग दीड महिना बंद करून शोधमोहीम राबविण्यात आली. 20 एप्रिल 2023 रोजी भटादुरियांमध्ये लष्करी वाहनावर पहिला ग्रेनेड हल्ला, त्यानंतर गोळीबार, पाच जवानांनी बलिदान दिले होते. 21 डिसेंबर 2023 सावनी येथे झालेल्या हल्ल्यात पाच बळी, दोन जखमी. 12 जानेवारी 2024 झालेल्या हल्ल्यातील अद्याप कुठलीही माहिती समोर आली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -