दिवाळी उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि प्रतिबंधित फटाके जाळण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
दिवाळीचा सण आनंदता , उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिळाळीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं आहे की, “देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.” असं म्हटलं आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी जवानांसोबत साजरी करतात. देशभरात दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायाला मिळत आहे. दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षीप्रामाणे यंदीची दिवाळी सैनिकांसोबतच साजरी करणार आहेत.
मोदी यंदाची दिवाळी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे भारतीय लष्कराच्या जवानांसोबत साजरी करणार आहेत. पतंप्रधानांच्या दौऱ्याबाबत शनिवारी रात्रीपर्यंत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलं नव्हते. पण संबंधित लष्करी तुकडीमध्ये त्यांच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येशे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान बीएसएफ जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
दिवाळीनिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईसह सर्व मोठ्या शहरांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवाळी उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि प्रतिबंधित फटाके जाळण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.