घरमनोरंजनRakesh Bedi: ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदींची फसवणूक; भारतीय सेनेच्या नावाखाली लाटले हजारो...

Rakesh Bedi: ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदींची फसवणूक; भारतीय सेनेच्या नावाखाली लाटले हजारो रुपये

Subscribe

राकेश बेदींना भामट्यांनी फसवलं आहे. राकेश बेदी यांची 75 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

Rakesh Bedi Scam: आजकाल घोटाळे सर्रास झाले आहेत. सामान्य जनताच नाही तर मोठे स्टार्सही फसवणुकीचे बळी ठरत आहेत. नुकताच गदर 2 चे अभिनेते राकेश बेदींना भामट्यांनी फसवलं आहे. राकेश बेदी यांची 75 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. (Rakesh Bedi Veteran Actor Rakesh Bedi Cheats Thousands waved in the name of Indian Army)

लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करून लुटले

30 डिसेंबर 2023 रोजी लोक वर्षातील शेवटचा दिवस आणि येणाऱ्या नवीन वर्षाचा आनंद साजरा करत होते. त्याचवेळी राकेश बेदींची हजारोंची फसवणूक झाली. लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यक्तीने राकेश बेदी यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत त्यांचे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. 1 जानेवारी 2024 रोजी अभिनेत्याने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

नेमकं घडलं काय

राकेश यांनी अशी माहिती दिली की, त्यांना एक फोन कॉल आला होता. फोनवर बोलणाऱ्या त्या व्यक्तीने तो आर्मी ऑफिसर असल्याचं सांगितलं होतं. त्याने असं म्हटलेलं की त्या अभिनेत्याच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये रस आहे. त्या संभाषणादरम्यान अभिनेत्याला लक्षात आले की तो फोन कॉल एक फसवणूक आहे.

राकेश बेदी यांनी ETimes शी बोलताना या फसवणुकीची माहिती दिली आहे. अभिनेता म्हणाले, सर्वांनी फसवणूक करणाऱ्या ठगांपासून सावध राहायला हवं, काही ठग हे लष्करी अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करतात. तसंच, ते रात्रीच फोन करतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला समजतं की आपली फसवणूक झाली आहे, तोपर्यंत त्या भामट्यांनी आपल्याला लुटलेलं असतं.

- Advertisement -

4 दशके चित्रपटसृष्टीत योगदान

69 वर्षीय राकेश बेदी गेल्या चार दशकांपासून चित्रपटसृष्टीशी जोडले गेले आहेत. त्यांनी टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत काम केले आहे. बेदी हे विकी कौशलचा चित्रपट जरा हटके जरा बचके आणि सनी देओल स्टारर गदर 2 मध्ये दिसले होते. 2022 मध्ये राकेश यांनी वाह भाई वाह या टीव्ही शोमध्ये काम केले होते.

(हेही वाचा: रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ‘या’ दिवशी करणार लग्न )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -