Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipहनिमूनवरून आल्यानंतर कपल्सनी करावे 'हे' काम

हनिमूनवरून आल्यानंतर कपल्सनी करावे ‘हे’ काम

Subscribe

लग्नानंतर जवळपास प्रत्येक जोडपी हनिमूनला जातात. एकमेकांसोबत निवांत वेळ घालविण्यासाठी, एकमेकांच्या सवयी आणि आवडी-निवडी जाणून घेण्यासाठी नवदाम्पत्याला हनिमूनला पाठवण्यात येते. पण, नव दाम्पत्याने नात्यातला ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी हनिमूननंतरही काही गोष्टी करणे गरजेचे असते.

हनिमूनहून परत आल्यावर काय करायचं?

- Advertisement -

बजेट प्लॅन – हनीमूनवरून परतल्यानंतर कपलने बजेट प्लॅन करणे गरजेचे आहे. रोजचा खर्च, लागणाऱ्या वस्तू, त्यासाठी होणारा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टींचे आधीच नियोजन कराल तर तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक करू शकाल आणि काही पैसेही वाचू शकाल.

आठवणी जपा- लग्नाचे आणि हनिमूनचे सुंदर क्षण अल्बममध्ये जतन करा. काही वर्षांनंतर हेच फोटो पाहिल्यावर
तुमच्या गोड आठवणी तुम्हाला आठवतील. याने तुम्ही पुन्हा त्या क्षणांमध्ये हरवून जाल आणि तुमचे प्रेम टिकून राहील.

- Advertisement -

धावपळीतून ब्रेक घ्या – हनीमूनवरून परतल्यानंतर लगेचच ऑफिसच्या कामात बिझी होऊ नका. थोडा वेळ पार्टनरसाठी काढा. सोशल मीडिया, तुमचे काम यापासून दूर राहा. त्याऐवजी एकमेकांना वेळ द्या. तुमच्या पार्टनरला कुटुंबाशी जुळवून घेण्यासाठी मदत करा.

पुढील पिकनिकचे प्लॅन करा – घरातील जबाबदाऱ्यांमुळे कित्येक जोडप्याना एकमेकांसाठी वेळ मिळत नाही आणि कालातंराने आयुष्य कंटाळवाणे होऊन जाते. हे टाळण्यासाठी किमान ६ महिन्यातून तरी पार्टनरसोबत फिरण्याचा प्लॅन करा. ज्याने तुमच्यात प्रेम आणि रोमान्स कायम राहील.

 

 


हेही वाचा ; एक मिठी आणि सगळे आजार गायब..

- Advertisment -

Manini