घर नवरात्रौत्सव 2022 नवरात्रीमध्ये कांदा, लसूण का खात नाहीत? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

नवरात्रीमध्ये कांदा, लसूण का खात नाहीत? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Subscribe

हिंदू धर्मामध्ये अनेक कुटुंबांमध्ये नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण खात नाहीत. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या काळात मासांहार आणि कांदा, लसूण या तामसिक पदार्थांचे सेवन केले जात नाही.

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. दरम्यान, नवरात्रीच्या काळात अनेक नियम पाळले जातात.

- Advertisement -

नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण का खात नाहीत?
हिंदू धर्मामध्ये अनेक कुटुंबांमध्ये नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण खात नाहीत. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या काळात मासांहार आणि कांदा, लसूण या तामसिक पदार्थांचे सेवन केले जात नाही.

जाणून घ्या यामागची पौराणिक कथा
हिंदू पुराणांनुसार, जेव्हा देवता आणि राक्षस यांच्यामध्ये समुद्र मंथन झाले होते त्यावेळी समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले आणि शेवटी त्यातून अमृता निघाले. त्यानंतर भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केलं आणि देवतांना अमृत देऊ लागले. तेव्हा राक्षसांमधील राहू-केतु देवाचं रूप घेऊन अमृत प्राशन केले. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने राहू-केतुच धड आणि डोक वेगळं केलं. त्यावेळी त्याच्या रक्ताचे काही थेंब जमीनीवर पडले आणि त्या थेंबांपासुनच कांदा आणि लसणाची उत्पत्ती झाली. त्यामुळेच कांदा आणि लसणातून तिखट वास येतो. शिवाय असं देखील म्हटलं जात की, राहू-केतूच्या शरीरामध्ये त्यावेळी अमृताचे काही थेंब पोहोचले होते त्यामुळे कांदा आणि लसणामध्ये रोगांशी लढण्याची क्षमता असते.

- Advertisement -

असं म्हटलं जात की, कांदा आणि लसणाच्या जास्त वापर केल्याने मानसाचा धार्मिक गोष्टीत रस कमी होतो. पुराणांमध्ये कांदा आणि लसणाला राजसिक आणि तामसिक मानले जाते. असं म्हटलं जातं की, तामसिक आणि राजसिक गुण वाढल्यास मानसाचे अज्ञान कमी होते. त्यामुळे नेहमीच सात्विक आहार करण्याचे सल्ले दिले जातात. तामसिक पदार्थांमध्ये मांस-मच्छी, कांदा, लसूण यांना राक्षस प्रवृत्तीचे अन्न मानले जाते. यांच्या सेवनाने घरामध्ये अशांति, रोग आणि चिंता घरामध्ये प्रवेश करते.


हेही वाचा : 

नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ ग्रंथाचं पठण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -