Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousShardiya Navratri 2023: देशभरात प्रसिद्ध आहेत 'ही' देवी दुर्गेची मंदिरे

Shardiya Navratri 2023: देशभरात प्रसिद्ध आहेत ‘ही’ देवी दुर्गेची मंदिरे

Subscribe

देशभरात नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रौत्सव मोठ्या आनंदात-उत्साहात साजरा केला जातो. यावेळी देवीची पूजा-अर्चना केली जाते आणि मंदिरा ही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. अशातच भारतातील काही देवी दुर्गेची मंदिरे प्रसिद्ध आहेत त्याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.

-वैष्णो देवी मंदिर
हे भारतातील सर्वाधिक पवित्र मंदिरांपैकी एक आहे. येथे जगभरातील हिंदू भाविक दर्शनासाठी येतात. जम्मू-कश्मीर मधील कटरा जिल्ह्यात असलेल्या मंदिरात वर्षभर भाविक येतात. असे मानले जाते की, देवी दुर्गा येथील पवर्तांच्या रुपात एका गुहेत निवास करते. हे मंदिर कटारापासून 13 किमी उंचीवर आहे.

- Advertisement -

-त्रिपुरा सुंदरी मंदिर, त्रिपुरा
हिंदू पौराणिक कथेनुसार मंदिर अशा ठिकाणी तयार करण्यात आले आहे जेथे सतीचा डावा पाय पडला होता. हे मंदिर पूर्वोत्तर भारतीय राज्य त्रिपुरातील उदयपूर शहरात आहे. हा मंदिरा देवी कालीची पूजा सोरोशीच्या रुपात केली जाते.

-मंगळा गौरी मंदिर, गया (बिहार)
लोकप्रिय मान्यतेनुसार आज जेथे हे मंदिर आहे तेथे देवी सतीचे स्तन पडले होते. हे मंदिर गयातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. नवरात्रौत्सवादरम्यान येथे भाविकांची फार मोठी मंदिरात गर्दी होते.

- Advertisement -

-दंतेश्वरी मंदिर, छत्तीसगढ
छत्तीसगढ मधील बस्तर क्षेत्रात असलेल्या दंतेवाडा येथील दंतेश्वरी मंदिर प्रसिद्ध आहे. निर्सगाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर फार जुने आहे. अशी मान्यता आहे की, सतीचा येथे दात पडला होता. याच कारणास्तव या ठिकाणाचे नाव दंतेश्वरी असे पडले.

-दुर्गा मंदिर, वाराणसी
हे मंदिर रामनगर येथे आहे. असे मानले जाते की, मंदिराचे बांधकाम एका बंगालच्या महाराणीने 18व्या शतकात केले होते. हे मंदिर वास्तुकलेच्या उत्तर भारतीय शैलीच्या नागर शैलीमध्ये तयार करण्यात आले आहे. या मंदिरात एक तलाव सुद्धा आहे. ज्याला देवी दुर्गा कुंड नावाने ओळखले जाते. या मंदिरातील मुर्ती ही व्यक्तीने तयार करण्यात आलेली नाही. तर ही स्वयंभू आहे.

-श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
श्री महालक्ष्मी मंदिर विविध शक्ती पीठांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे ते आहे. भगवान विष्णूची पत्नी असल्याच्या नात्याने या मंदिराचे नाव माता महालक्ष्मी असे पडले.

-नैना देवी मंदिर, नैनीताल
नैनीताल मध्ये नैन झऱ्याच्या उत्तर किनाऱ्यावर नैना देवी मंदिर आहे. 1880 च्या भुस्खलनानंतर हे मंदिर नष्ट झाले होते. त्यानंतर त्याची पुर्नबांधकाम केले गेले. येथे सतीच्या शक्ती रुपाची पूजा केली जाते. मंदिरात दोन नेत्र आहेत, जे नैना देवी असल्याचे दर्शवते.


हेही वाचा- Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ ग्रंथाचं पठण

- Advertisment -

Manini