गरबा वर्कशॉपला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद

दोन वर्षांच्या खंडानंतर सध्या सगळीकडे नवरात्रौत्सवाचा जल्लोष दिसतोय. त्यामुळे नाचता येणाऱ्या आणि न येणाऱ्या अनेकांचे पाय गरबा वर्कशॉपकडे वळले आहेत. काळाचौकीतील व्ही.जे. डान्स अकॅडमी आणि आर्ट स्टुडिओमध्येही गरबा वर्कशॉपला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या वर्कशॉपमध्ये साध्या सोप्या स्टेप्स शिकवल्या जात आहेत. ज्याचा फायदा सर्वांनाच होतोय आहे.