नाचणीचे बेसन डोसे

नाचणीचे बेसन डोसे

प्रत्येक घरामध्ये ज्वारी, बाजरी किंवा तांदुळाची भाकरी करण्यात येते. मात्र, नाचणीची भाकरी फार क्वचित वेळा केली जाते. खरं तर नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला नाचणीचे बेसन डोसे कसे तयार करायचे ते सांगणार आहोत.

साहित्य

  • २ वाट्या नाचणीचे पीठ
  • १ वाटी बेसन पीठ
  • आलं-लसूण, मिरची पेस्ट
  • हळद
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ टोमॅटोची प्युरी
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती

सर्वप्रथम नाचणीचे पीठ, बेसन पीठ, आलं-लसूण, मिरची पेस्ट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटोची प्युरी आणि मीठ एकत्र करुन घ्यावे. हे पीठ डोशाच्या पिठाएवढे पातळ करावे. त्यानंतर नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल टाकून डोसे बनवावेत. हे तयार डोसे चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावे.