घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाय योजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तट रक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाय योजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तट रक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. (All out cooperation to the Coast Guard for the maritime security of Maharashtra Chief Minister Eknath Shinde)

- Advertisement -

या भेटीत बाडकर यांच्यासह या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री  शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती दिली. तट रक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तत्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले.

त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तट रक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

- Advertisement -

(हेही वाचा :चौंडीतील धनगर समाजाचं आंदोलन अखेर मागे; गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -