Monday, April 29, 2024
घरमानिनीSummer Food : अशा प्रकारे तयार करा मिरचीचे लोणचे

Summer Food : अशा प्रकारे तयार करा मिरचीचे लोणचे

Subscribe

जेवणात लोणचं असल्यास जेवणाची चव अधिक चविष्ट होतेत्यात जर आंबट-तिखट लोणचे असेल तर अधिक उत्तममात्रकाहींना बाजारातील लोणच खाण्यास आवडत नाहीअशा वेळी घरच्या घरी चविष्ट आणि तिखट लोणचे एकदा तरी अवश्य करुन पाहा.

साहित्य :

  • 1/2 किलो हिरवी मिरची
  • 1 वाटी मोहरीची डाळ
  • 1/4 चमचा मेथीची (कच्ची) पूड
  • 3/4 चमचा हळद
  • 1 चमचा हिंग
  • 2 वाट्या मीठ
  • 6 लिंबाचा (रस)
  • 1/2 वाटी तेल

कृती :

4 different ways to make Mirchi achaar at home | The Times of India

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद आणि हिंग घालावे आणि कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते ताटलीच्या पदार्थांवर ओतावे आणि झार्‍याने ढवळावे.
  • मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावे. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे.
  • त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा आणि बरणीत 2 चमचे मीठ घालावे.
  • त्यात मिरच्या आणि मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा. अशाप्रकारे तुमचे मिरचीचे लोणचे तयार.

हेही वाचा :

Summer Food : उन्हाळ्यात बनवा आवळ्याचं चटपटीत लोणचं

- Advertisment -

Manini