घरपालघरआदिवासी बांधवांची दिवाळी झाली गोड

आदिवासी बांधवांची दिवाळी झाली गोड

Subscribe

शहरी भागापासून दूर ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यावस्तींवर, कसे तरी उभ्या असलेल्या कुडाच्या झोपडीतील आदिवासींचे चित्र म्हणजे अगदी त्याउलट. तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण म्हणजे एकप्रकारे अनेक कोस दूरचे अंतर.

मोखाडा: भारतीय जनता पक्ष मोखाडा तालुका आणि साहिल कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत १००० आदिवासी कुटुंबांना फराळ वाटप करण्याचा मानस करण्यात आला. भाऊबीज आणि भगवान बिरसा मुंडा जयंती आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त तालुक्यातील घोडीपाडा, धारेचापाडा, चारणवाडी आणि डोल्हारा , साखरवाडी येथे विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.हेमंत विष्णू सवरा आणि तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले तरी, शहरी भागापासून दूर ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यावस्तींवर, कसे तरी उभ्या असलेल्या कुडाच्या झोपडीतील आदिवासींचे चित्र म्हणजे अगदी त्याउलट. तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण म्हणजे एकप्रकारे अनेक कोस दूरचे अंतर.

परंतु,गोरगरिबांच्याही आयुष्यात दिवाळीची पाडवा पहाट उजाडावी. त्यांच्याही चेहर्‍यावर आनंद फुलावा, या नि:स्वार्थ भावनेने या आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांसोबत भाजपने दिवाळी साजरी केली यावेळी भाजपचे नेते विठ्ठल चोथे, रघुवीर डिंगोरे, मिलिंद झोले, दिलीप गाटे, राजेंद्र तुमडे, प्रतीक पाघारे , दिशांत पाटील , जनार्दन गभाले , शुभम डींगोरे , गणेश पाटील, हर्षल बात्रे, भरत नडगे, हरीश शिंदे, नरेंद्र चौधरी , पप्पू मुळे आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -