घरपालघरहिवाळ्यातील गोड, तुरट , आंबट रानफळांची मुबलक आवक

हिवाळ्यातील गोड, तुरट , आंबट रानफळांची मुबलक आवक

Subscribe

त्यामुळे येथील नागरिकांना जंगलातील उपलब्ध होत असलेली रानफळे बाजारात आणून विक्री करणे आणि त्यातून आपले दिवस मजुरी सोडवणे असा दिनक्रम हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सुरू झाला आहे.

जव्हार: हिवाळ्यात सर्वांना वेध लागतात ते गुलाबी थंडीचे आणि साखर झोपेचे तसेच या थंडीच्या दिवसात उपलब्ध होत असलेल्या विविध रान फळांचे. खेडोपाडी आताही चांगलीच थंडी जाणवत आहे. यातच खास हिवाळ्यातील रानफळांचे आगमन सुरू झाले आहे. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे रानावनात आंबे, जांभूळ, काजू, इत्यादी रानफळे खावयास मिळतात तसेच खास हिवाळी दिवसातही विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार्‍या थंडीच्या मोसमातील पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फळे म्हणून ही फळे प्रसिद्ध आहेत. तालुक्यातील ग्रामीण भाग हा जंगलव्याप्त असल्याने, या भागात निसर्गनिर्मित रानमेवा येथील आदिवासी नागरिकांसाठी उपजीविकेचे हवामानानुसार एक साधन बनत आहे.सध्या चांगलाच हिवाळा सुरू झाल्याने जंगलातील रानफळांना बहर आला असून शहरातील बाजारपेठेत गोड, तुरट आणि आंबट फळांची आवक वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना जंगलातील उपलब्ध होत असलेली रानफळे बाजारात आणून विक्री करणे आणि त्यातून आपले दिवस मजुरी सोडवणे असा दिनक्रम हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सुरू झाला आहे.

हिवाळ्यात विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे, चिंच इत्यादी फळांचा समावेश होतो. चवीला गोड नसणारी, आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग असून शहरात ठिकठिकाणी बसणार्‍या या फळ विक्रेत्यांची विक्री वाढून या फळांना मागणी वाढली आहे. काटेरी अशा बोरीच्या झाडांवर आढळणारी बोरे पक्व होण्यास सुरुवात झाली असून, बाजारात ५ ते १० रुपयांना कागदी पुडीमध्ये ती विकली जात आहेत. याच दिवसातील चिंचांचा स्वाद घेणे, मिठासोबत खाणे अनेक जण पसंत करतात. पूर्ण परिपक्व झालेल्या चिंचांचा मोसम सुरू होत असून खवय्यांना आंबट चव देणार्‍या चिंचांची बोंदुके भुरळ घालत आहेत. बोरी ,चिंचांप्रमाणे बाजारात आवळे उपलब्ध झाले आहेत.भरपूर प्रमाणात जीवनसत्व देणारे आवळे १०० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत. आवळ्याचा पेठा, लोणचे, चवनप्राश इत्यादी बनविण्याकडे गृहिणीनी पसंत दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया

आम्ही दररोज सकाळी आंबट बोरे आणण्यासाठी जात असतो.जव्हार शहरात आल्यानंतर केवळ दोन तासांमध्ये ३०० ते ४०० रुपये विक्री होऊन दिवसाचा खर्च सुटत असतो. बाजारात खवय्ये देखील आवर्जून जंगलातील आंबट-बोरे शोधत असतात.

- Advertisement -

– अर्चना तुंबडा,बोरे विक्रेती महिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -