Sunday, May 12, 2024
घरमानिनीReligiousलाडक्या बाप्पाला 'या' कारणास्तव 21 दुर्वा वाहतात

लाडक्या बाप्पाला ‘या’ कारणास्तव 21 दुर्वा वाहतात

Subscribe

बाप्पा म्हटलं का बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक, जास्वंदाचे फूल आणि दुर्वा हे आलेच. बऱ्याचदा गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात. मात्र, या दुर्वा का वाहिल्या जातात. यामागची नेमकी काय आख्यायिका आहे. याबाबत तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला गणरायास दुर्वा का वाहतात याबाबत सांगणार आहोत.

काय आहे आख्यायिका?

ऋषी मुनी आणि देवता यांना मायावी अनलासुर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. त्यानंतर अखेर देव गणपतीला शरण गेले आणि देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाले होते, म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

- Advertisement -

दुर्वा चढवताना या मंत्राचा करा जप

ॐ गणाधिपाय नमः
ॐ उमापुत्राय नमः
ॐ विघ्ननाशनाय नमः
ॐ विनायकाय नमः
ॐ ईशपुत्राय नमः
ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः
ॐ एकदन्ताय नमः
ॐ इभवक्त्राय नमः
ॐ मूषकवाहनाय नमः
ॐ कुमारगुरवे नमः


हेही वाचा – Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये?

- Advertisment -

Manini