घरदेश-विदेशकुख्यात दहशतवादी उजैर खानचा खात्मा; अनंतनागमध्ये शांततेचे वातावरण

कुख्यात दहशतवादी उजैर खानचा खात्मा; अनंतनागमध्ये शांततेचे वातावरण

Subscribe

या कारवाईबाबत माहिती देताना सैन्य अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, लष्कर कमांडर उज्जैर खान मारला गेला आहे. त्याच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत सुरू असलेली चकमक संपली आहे. कारण, भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले असून, त्यामध्ये कुख्यात दहशतवादी उज्जैर खान याचा देखील समावेश आहे. सध्या या भागात शांततेचे जरी वातावरण असले तरी भारतीय सैन्याकडून शोधमोहीम सुरूच आहे. (Elimination of notorious terrorist Uzair Khan Tranquil atmosphere in Anantnag)

या कारवाईबाबत माहिती देताना सैन्य अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, लष्कर कमांडर उज्जैर खान मारला गेला आहे. त्याच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय आणखी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे आता अनंतनागमध्ये चकमक संपली असली तरी शोधमोहीम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

शोध मोहिमेत सापडले दोघांचे मृतदेह

अनंतनागच्या जंगलात दडून बसलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी भारतीय सैन्याकडून शोध मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेदरम्यान भारतीय सैनिकांना दोन मृतदेह सापडले. यापैकी एक मृतदेह उज्जैर खान याचा आहे. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसल्याची देण्यात आली आहे. तर आता अनंतनागच्या खोऱ्यातील दहशतवादाविरुद्ध चाललेल्या दीर्घ कारवायांच्या यादीत गडूल ऑपरेशनचा समावेश करण्यात आला आहे. तर घनदाट जंगल आणि थेट डोंगरावर कोरलेल्या नैसर्गिक गुहांमुळे मोहीम फत्ते करण्यास विलंब लागल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईत ड्रोन आणि इतर आधुनिक शस्त्रे आणि उपकरणेही सुरक्षा दलांनी वापरली हे विशेष.

हेही वाचा : महिला आरक्षण विधेयकाची पंतप्रधानांकडून घोषणा; घटना दुरुस्तीनंतर होणार मार्ग मोकळा

- Advertisement -

उज्जैर खानवर होता दहा लाखाचा इनाम

कोकरनाग येथे झालेल्या चकमकीत तीन सुरक्षा अधिकारी आणि एक जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी संघटना असलेल्या टीआरएफने घेतली होती. 10 लाख रुपयांचे इनाम असलेला दहशतवादी उज्जैर खान हा हल्ला करण्यात सहभागी होता. उज्जैर खान हा स्थानिक दहशतवादी होता, तो कोकरनागच्या नौगाम गावचा रहिवासी होता. जून 2022 पासून उज्जैर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला.

हेही वाचा : जुन्या संसदेला मिळाली आज नवी ओळख; पंतप्रधानांनी केली ‘ही’ घोषणा वाचा-

उंच टेकडीवर होते लपून

12 सप्टेंबर रोजी कोकरनागच्या जंगलामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. त्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यादरम्यान राबविलेल्या शोध मोहिमेत सैन्याने दहशतवाद्यांचे तळ शोधून काढत त्यांचा खात्मा केला. यामध्ये दोन भारतीय सैनिकही गंभीर जखमी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -