घरफोटोगॅलरीPhoto : गणपती बाप्पा मोरया… प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Photo : गणपती बाप्पा मोरया… प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Subscribe

लाडक्या बाप्पाची 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज निरोप देण्यात येणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. पुण्यातील पाचही मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले आहेत. तसेच मुंबईतील लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकाय गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा राजा हे सर्व मोठ्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

 

- Advertisement -

मुंबई आणि पुण्याच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अनेक गणेशभक्त आणि पर्यटन हजारोच्या संख्येने गर्दी करतात. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबईचा राजा हा पहिला मानाचा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मुंबईचा राजानंतर नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजा हा हळूहळू विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ होत आहे.

- Advertisement -

मुंबईतील लालबाग-परळ परिसरात मोठ-मोठे गणपती बाप्पाची मंडळ आहेत. या परिसरात गणेशभक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

लालबागचा राजाची सकाळी आरती झाल्यानंतर विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.  लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या असा एकच घुमजाव ऐकू येऊ लागला.

या पार्श्वभूमीवर मोठा कडकोट सुरक्षा व्यस्था मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. यासाठी मुंबई पोलिसांकडून 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25पोलीस उपायुक्त, 45सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2866 पोलीस अधिकारी आणि 16, 258 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.या बरोबरच 35 एसआरपीएफ पलटन, दंगल नियंत्रण पथक, क्यूआरटी पथक आणि होमगार्डस हे देखील मुंबईतील विसर्जन मिरवणुकीत तैनात करण्यात आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -