Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousShardiya Navratri 2023 : नवरात्रीत अखंड दिवा का लावला जातो? जाणून घ्या...

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत अखंड दिवा का लावला जातो? जाणून घ्या महत्व आणि नियम

Subscribe

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

यंदा रविवार, 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होणार असून सोमवार, 23 ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच 24 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल.

- Advertisement -

नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते?

हिंदू धर्मात कोणतही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. यामागे असं कारण आहे की दीव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे. दीव्याने सकाराकत्मक ऊर्जा येते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण 9 दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते. कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये हा अखंड दीवा लावण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

अखंड ज्योत लावण्याचे नियम

How To Lit Akhand Jyoti | how to lit akhand jyoti | HerZindagi

- Advertisement -

 

  • जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तेव्हा घरामध्ये सकारात्मक दिशेचा पालन करायला हवे. घरामध्ये कोणतीही अपवित्र गोष्ट ठेऊ नये.
  • या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच 9 दिवस घरामध्ये बनवू नये तसेच मांसाहार करू नये.
  • जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दीवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तूपाचा दीवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जातं. दीवा लावताना दीपम घृत दक्षे, तेल युत: च वामत: या मंत्राचा उच्चार करा.
  • अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस विजू देऊ नका. कारण हे अशुभ मानले जाते. दीवा विजू नये म्हणून काचेच्या कवरने त्याला झाकून ठेवा.
  • अखंड दीवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवाल. ते ठिकाण स्वच्छ असायला हवे शिवाय घरातील शौचालयाच्या आस-पास दीवा ठेऊ नये.

हेही वाचा :

Shardiya Navratri 2023 : शारदीय नवरात्र का साजरी केली जाते? वाचा पौराणिक कथा

- Advertisment -

Manini