Tuesday, April 30, 2024
घरमानिनीवाढत्या वयासह लग्नासाठी स्थळ येत नाहीये? करा हे उपाय

वाढत्या वयासह लग्नासाठी स्थळ येत नाहीये? करा हे उपाय

Subscribe

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा निर्णय आणि क्षण असतो. अशातच काही लोकांचे असे होते की, वय वाढत जाते पण त्यांना योग्य स्थळ मिळत नाही. यामागे काही कारणं असू शकतात. ज्योतिष शास्रानुसार कुंडली दोषामुळे लग्न जमण्यासाठी काही समस्या येऊ शकतात. तर असे तुमच्यासोबत सुद्धा होत असल्यास नक्की काय उपाय करावेत याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.ग्रहांच्या उपायानुसार प्रत्येकावर वेगवेगळा प्रभाव असतो. त्यामुळे विविध वयानुसार त्याच प्रमाणे उपाय करावे लागतात.

काय कराल?

- Advertisement -

-जर तुमचे लग्न होत नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी १८ ते २४ वर्षातील लोकांनी पिवळ्या रंगाचे वस्र घालावे. शिव-पार्वती यांच्या मुर्तीवर मंदिरात अथवा घरात ॐ गौरी शंकराय नम: असा जाप करावा.
-शंकर-पार्वतीची एकत्रित पूजा केल्यामुळे ते प्रसन्न होतील. त्याचसोबत तीन महिन्यापर्यंत हा उपाय केल्याने तुमच्या लग्नात येणारे सर्व अडथळे दूर होतील.
-लग्नासाठी योग्य स्थळ मिळण्यासाठी समस्या येत असतील तर त्यामध्ये मंगळ दोष, गुण न मिळणे आणि अन्य प्रकारच्या काही समस्या असू शकतात. अशातच तुमचे वय जर २५-३० दरम्यान असेल तर पिवळ्या रंगाचे वस्र घालून शिवलिंगावर सुगंधित फुले चढवा आणि मनात देवाकडे तुमची इच्छा मागा. तुमची मनोकामना असे केल्याने पूर्ण होईल.
-जर तुमचे वय ३१-३५ वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर घराच्या मागच्या बाजूला केळ्याचे झाडं लावा आणि गुरुवारी त्या झाडाखाली बसून ॐ बृ बृहस्पतये असा जाप करा.

 

- Advertisement -

हे देखील वाचा : Home Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini