Thursday, May 2, 2024
घरमानिनीसदाफुलाचा चहा उपाशीपोटी प्यायल्याने होतात 'हे' फायदे

सदाफुलाचा चहा उपाशीपोटी प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे

Subscribe

सदाफुलाचा चहाबद्दल तुम्ही ऐकले आहे का? खरंतर नाहीच. पण आयुर्वेदात सदाफुलाचा वापर हा काही समस्यांवर उपचारासाठी केला जातो. मधुमेह असलेल्या रुग्णांनी जर ही चहा घेतली तर रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास फार मदत होते. परंतु या व्यचतिरिक्त सुद्दधा सदाफुलाची चहा ही आरोग्याच्या दृष्टीने खुप फायदेशीर मानली जाते. सर्वात प्रथम तुमच्या शरिरातील काही मेटाबोलिक हालचाली वाढतात आणि दुसरे म्हणजे मानसिक समस्या कमी होतात. अशा प्रकारच्या आरोग्यासाठी सदाफुलाची चहा ही काही प्रकारे खुप फायदेशीर मानली जाते. याच बद्दल आपण अधिक सविस्तर जाणून घेऊयात.

सदाफुलाचा चहा कसा तयार करतात?
सदाफुलाची ४-५ पाने आणि त्याची दोन फुलं घ्या. ती पिण्यात उकळवा आणि नंतर त्यात थोडा लिंबू, मीठ आणि मध टाका. असे केल्यानंतर त्याचे सेवन करा.

- Advertisement -

सदाफुलाचा चहा पिण्याचे फायदे
-श्वासासंबंधित समस्यांसाठी फायदेशीर
सदाफुल हे कफ संदर्भातील आजार दूर करतात असे आयुर्वेदात सांगितले गेले आहे. या फुलात आढळणारे बायोएक्टिव गुण अस्थमा, ब्रोंकाइटिस, सीओपीडी, खोकला आणि श्वसनासंबंधित विकारांच्या उपचारासाठी फार मदतशीर असते.

- Advertisement -

-उच्च रक्तदाब असलेल्यांनी प्या
सदाफुल हे एक नैसर्गिक अँन्टीहायरटेंसिव एजेंटच्या रुपात कार्य करते. त्यामुळे वाढलेल्या ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यात मदत होते. या व्यतिरिक्त सदाफुल हे कार्डिओ-टॉनिक असल्याने जे हृदयाला योग्य पद्धतीने काम करण्यास मदत करते.

-संज्ञानात्मक कार्यप्रणालीत सुधार
सदाफुल हे मेंदू्च्या कार्यप्रणालीला चालना देण्यासाठी एक उत्तम पारंपारिक उपाय आहे. यामध्ये असलेले अँन्टिऑक्सिडेंट आणि फ्लेवोनोइड्स एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती, एकाग्रता, शांती आणि सतर्कता सुधारण्यास मदत करते. या व्यतिरिक्त याची चहा पिणे म्हणजे ब्रेन टॉनिक सारखे आहे. जे संज्ञानात्मक क्षमतांच्या सुधारणेसाठी मदत करतात.

 


हेही वाचा- किचनमध्ये बसून जेवणं योग्य आहे का?

- Advertisment -

Manini