Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHibiscus Flower Tips : जास्वंदीचे फूल अनेक समस्यांसाठी उपयुक्त

Hibiscus Flower Tips : जास्वंदीचे फूल अनेक समस्यांसाठी उपयुक्त

Subscribe

जास्वंदीमध्ये आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे गुणधर्म केसांचे पोषण करतात. त्यामुळे तुमचे केस गळणे कमी होऊन लांब आणि दाट दिसू लागते.

अनेकदा आपण त्वचेची काळजी घेत असतो. तसेच आरोग्यासाठी वेगवेगळ्या फुलांचा वापर देखील करतच असतो. कारण यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आढळतात, काही फुले केसांसाठी खूप फायदेशीर असतात. यापैकी एक म्हणजे जास्वंद (हिबिस्कस) हे फूल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या फुलाचा वापर केसांना नियमितपणाने केल्याने अनेक फायदे होतात.
जास्वंदीची फुले प्रत्येकाच्या घरी सहज उपलब्ध असतात. त्यात आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे गुणधर्म केसांचे पोषण करतात. त्यामुळे तुमचे केस गळणे कमी होऊन लांब आणि दाट दिसू लागते.
How to Identify and Control Caterpillars on Tropical Hibiscus
जास्वंदीच्या फूलांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया-
  • हिबिस्कसच्या पानांमध्ये जास्तीत जास्त मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात.
  • पांढऱ्या केसांची समस्या निर्माण होत असेल तर त्यासाठी हिबिस्कस फ्लॉवरचा वापर करावा.
  • जास्वंदीच्या फुलामध्ये नैसर्गिक स्वरूपात अमिनो असिड प्राप्त असते जे केसांना पोषण देते.
  • केसांमध्ये चमक हवी असेल तर जास्वंदीच्या फुलाची पावडर आणि कोरफड जेल एकत्र करून त्याची पेस्ट बनवा.
  • जास्वंदाच्या फुलामध्ये असणारे अँटीफंगल गुणधर्म हे स्काल्प वरील स्किनला केसगळती पासून दूर ठेवतात.
  • जास्वंदीच्या सेवनाने रक्तदाब कमी राहतो.
  • जास्वंदीचा चहा आरोग्याला आहे फायदेशीर.
  • शरीरात उष्णतेचा दाह जास्त असेल तर जास्वंदीचा अर्क पियावा.
  • केस मोठ्याप्रमाणात गळत असतील तर जास्वंदीच्या तेलाने मालिश करावी.
  • जास्वंदीच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये जास्त प्रमाणात म्युसिलेज असते जे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
- Advertisment -

Manini