घरमुंबईRanichi Baug : राणीच्या बागेत विक्रमी गर्दी; पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी घेतला मनमुराद आनंद

Ranichi Baug : राणीच्या बागेत विक्रमी गर्दी; पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी घेतला मनमुराद आनंद

Subscribe

यंदाच्या पुष्पोत्सवात 'ॲनिमल किंग्डम’ ही संकल्पना घेवून उद्यान विभागाने हत्ती, वाघ आणि झेब्रा आदींच्या पुष्पप्रतिकृती साकारल्या आहेत. याशिवाय पुष्पोत्सवात विविधरंगी फुलझाडे, फळझाडे-भाजीपाल्यांचाही समावेश आहे. यासाठी तब्बल दहा हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला आहे

मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणीची बागेत) येथे  फुलझाडे, फळझाडे आणि भाजीपाला प्रदर्शन 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असलेल्या पुष्पोत्सवास अश्विनी भिडे यांनी भेट देऊन कौतुक केले.

मुंबई महापालिकेच्या उद्यान खत्यामार्फत भायखळा येथील राणीच्या बागेत ( वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय) दरवर्षी प्रमाणे आग यंदाही फुलझाडे, फळझाडे-भाजीपाला यांचे प्रदर्शन २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीसाठी भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते २ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असलेल्या पुष्पोत्सवास अश्विनी भिडे यांनी भेट देऊन कौतुक केले.

- Advertisement -

या तीन दिवस प्रदर्शनात सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले असणार होते. या प्रदर्शनासोबतच उद्यान विषयक वस्तुंच्या विक्रींची दालने, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने देखील या ठिकाणी उभारण्यात आली आहेत.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : संत तुकाराम महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत – छगन भुजबळ

- Advertisement -

मुंबईकरांनी मोठ्यासंख्येन प्रदर्शनाला दिली भेट 

कुठे गुलाब फुललेला, तर कुठे सुगंध देणारा चाफा, कुठे झेंडूच्या फुलांचा साज, तर कुठे बहरलेल्या वृक्षवेली, चोहीकडे सुगंध दरवळलेला आणि त्याभोवती मनमोहक फुलांच्या माळा, अशा मखमली आणि प्रसन्न वातावरणात मुंबईकरांनी वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनातील पुष्पोत्सवाचा आनंद लुटला. या प्रदर्शनाच्या तिन्ही दिवस बच्चे कंपनीने या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देवून मज्जा केली.

याप्रसंगी उद्घाटनाप्रसंगी, पालिका उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. पुष्पोत्सवाला अभिनेता रणजित यांनीही भेट दिली. प्रदर्शनातील विविध फुल, झाडे यांची मांडणी पाहून भारावून गेलेल्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांना आपला मोह आवरता आला नाही. त्यांनी लगेचच आपला मोबाईल कॅमेरा ओपन करून पटापट फोटो टिपले.

हेही वाचा – Shambhuraj Desai : महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक; शंभूराज देसाईंनी दिली माहिती

‘ॲनिमल किंग्डम’ ही संकल्पनेवर आधारित पुष्पोत्सव

यंदाच्या पुष्पोत्सवात ‘ॲनिमल किंग्डम’ ही संकल्पना घेवून उद्यान विभागाने हत्ती, वाघ आणि झेब्रा आदींच्या पुष्पप्रतिकृती साकारल्या आहेत. याशिवाय पुष्पोत्सवात विविधरंगी फुलझाडे, फळझाडे-भाजीपाल्यांचाही समावेश आहे. यासाठी तब्बल दहा हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाना-फुलांपासून साकारलेले ‘चांद्रयान’ प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : गद्दारांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार- उद्धव ठाकरे

दिग्ग्जांसह चिमुकल्यांनी दिली प्रदर्शनाला भेट

या प्रदर्शनाला उद्यानातील प्रवेशद्वाराजवळच साकारण्यात आलेल्या पुष्पोत्सवाला भेट देण्यासाठी मुंबईतील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहलीं काढून मोठी गर्दी केली होती. पुष्पोत्सव पाहण्यासाठी आलेले चिमुकले विविधरंगी आणि सुगंधी फुलांसोबत रमलेले पाहुन अनेकांनी चिमुकल्यांच्या चेहऱयावर पसरलेला आनंद भ्रमणध्वनीतील कॅमेऱयाद्वारे टिपला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -