Sunday, April 28, 2024
घरमानिनीजगातील पहिलीच घटना, गर्भातील बाळाची केली ब्रेन सर्जरी

जगातील पहिलीच घटना, गर्भातील बाळाची केली ब्रेन सर्जरी

Subscribe

अमेरिकेतील डॉक्टरांनी महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाची ब्रेन सर्जरी केल्याची बातमी व्हायरल झाली आहे. खरंतर हे जगातील एकमेव असे प्रकरण आहे जेव्हा गर्भातील बाळाची ब्रेन सर्जरी केली गेलीय. सीएनएनच्या मते, या आजाराला “वीनस ऑफ गॅलेन मालफॉर्मेन” नावाने ओळखले जाते. या आजारात मेंदूतून हृदयाकडे जाणाऱ्या शरिरातील नसांना समस्या उद्भवते. ही कठीण सर्जरी बोस्टन मधील ब्रिगम अॅन्ड वुमेन हॉस्पिटल मध्ये करण्यात आली आहे.

खरंतर अशी स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा हृदयापर्यंत जाणाऱ्या रक्त वाहिन्या योग्य पद्धतीने विकसित होत नाहीत. तर जटिलता पाहता त्यांनी असे म्हटले की, सर्वसामान्यपणे बाळांच्या जन्मानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात. रक्तपुरवठा मंद गतीने करण्यासाठी लहान कॉइल टाकण्यासाठी कॅथेटरचा वापर केला जातो. परंतु उपचार फार वेळाने केला जातो.

- Advertisement -

बाळाची काळजी घेतल्यानंतर सुद्धा या स्थितीतील नवजात बालकांपैकी ५०-६० टक्के बालक लगेच आजारी होतता. त्यांचा जवळजवळ ४० टक्के मृत्यू दर असतो. जीवंत राहणारी काही बालके गंभीर न्यूरोलॉजिकलच्या मुद्द्यांचा अनुभव करतात.

सीबीएस न्यूजच्या मते, बेबी डेनवर ही आईच्या पोटात सामान्य रुपात वाढत होती. पण जेव्हा एका नियमित अल्ट्रासाउंडवर डॉक्टरांना असे दिसले की, तिच्या मेंदूत हा आजार होता. अशा स्थितीतील बालकांचे हार्ट फेल किंवा ब्रेन डॅमेज होते. काहीवेळेस ते जीवंत ही राहत नाहीत. वास्तविकरित्या डेनवर ही गंभीर आजाराने वाढत होती.

- Advertisement -

हेही वाचा- आईच्या दूधापासून ज्वेलरी बनवण्याचा नवीन ट्रेंड

- Advertisment -

Manini