घरपालघरडि. एम. पेटीट रुग्णालयात मेंदूवरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

डि. एम. पेटीट रुग्णालयात मेंदूवरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

मेंदूवरील पहिल्याच, त्याही यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महापालिकेच्या रुग्णालयांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

वसईः वसई- विरार महापालिकेच्या डि. एम. पेटीट रुग्णालयात मेंदूवरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्याच चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यावर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली.महापालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याला लकवा मारला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. महापालिकेच्या डि. एम. पेटीट रुग्णालयातील डॉ. निखिल चमणकर यांनी रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ही शस्त्रक्रिया तब्बल साडेचार तास लागली. डॉ. बसरुर, नर्स सुनीता वर्तक, कॅरल ग्रासिस, अनिता वर्तक आदींनी यात भाग घेतला होता. मेंदूवरील अवघड शस्त्रक्रिया महापालिकेच्या डॉक्टरांनी करून दाखवल्याने आता महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या आजारावरील तसेच अवघड शस्त्रक्रिया होऊ शकतात, असा आशावाद निर्माण झाला आहे. डि. एम. पेटीट महापालिकेचे सर्वात जुने रुग्णालय म्हणून ओळखले जाते. याठिकाणी जास्त करून बाळंतपणे होतात. त्याचबरोबर लहान-मोठ्या आजारांवर उपचार केले जातात. मेंदूवरील पहिल्याच, त्याही यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महापालिकेच्या रुग्णालयांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

 

- Advertisement -

पालिका रुग्णालयात ही आता रुग्णांना चांगली सुविधा उपलब्ध होत आहे. आता पर्यंत पालिकेच्या आरोग्य सेवेवर टीका होत होती. परंतु आता मात्र येथील डॉक्टरांच्या टीमने प्रथमच मेंदू वरील शस्त्रक्रिया यशस्वी करून आरोग्य सेवेत चांगले काम केले आहे. ही शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांचे ,तेथील नर्स,आणि कर्मचार्‍यांचे अभिनंदन.

– हितेंद्र ठाकूर,आमदार, वसई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -