घरदेश-विदेशरेल्वे अपघातावेळी कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत व्हिडीओ कॉलवर होता गुंग; मथुरा ट्रेन...

रेल्वे अपघातावेळी कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत व्हिडीओ कॉलवर होता गुंग; मथुरा ट्रेन दुर्घटनेत मोठा खुलासा

Subscribe

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी केली असता, ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आणि मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याचे आढळून आले. या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्हीही समोर आला आहे.

मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी केली असता, ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आणि मोबाईल फोनमध्ये व्यस्त असल्याचे आढळून आले. या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. रेल्वेने तत्काळ प्रभावाने सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून विभागीय कारवाई सुरू केली आहे. (At the time of the train accident the employee was drunk on a video call Big revelation in Mathura train accident)

उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्थानकावर शकूर बस्ती ईएमयू ट्रेनचे इंजिन स्टॉपर तुटून फलाटावर चढले. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये उपस्थित पाचही जण मोबाईल फोन वापरत होते आणि मद्यधुंद अवस्थेत होते.

- Advertisement -

मथुरा रेल्वे स्थानक संचालक संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, चौकशीनंतर पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये लोको पायलटसह 4 तांत्रिक लोकांचा समावेश आहे. घटनेच्या वेळी हे सर्वजण ट्रेनमध्ये उपस्थित होते. त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात आली आहे.

ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर रेल्वेने कारवाई केली आहे त्यात लोको पायलट गोविंद बिहारी शर्मा आणि तांत्रिक टीमचे हरभजन सिंग, सचिन, ब्रिजेश कुमार आणि कुलदीप यांचा समावेश आहे. यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

- Advertisement -

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या लोकांचे काम ट्रेन प्ल‌ॅटफॉर्मवर लावणे आणि उभी करणे होते. मात्रे हे लोक ट्रेनमध्ये मोबाईल फोन वापरत होते. या कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता हे कर्मचारी 42 टक्के नशेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आज संध्याकाळपर्यंत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त होईल.

काल रात्री दहाच्या सुमारास शटल (लोकल) ट्रेन नवी दिल्लीहून मथुरेला पोहोचली. येथे प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. यानंतर ट्रेनचे शटर बंद करून ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी करायची होती. गाडी थांबवण्यासाठी ड्रायव्हरला ब्रेक लावायचा होता, मात्र एक्सलेटर दाबला गेला. यानंतर ट्रेन प्लॅटफॉ़र्मवर चढली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अप मार्गावरील अनेक गाड्यांवर परिणाम झाला

मथुरा रेल्वे स्टेशनचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘ट्रेन शकूर बस्ती येथून येत होती. ट्रेन फलाटावर येताच सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. त्यामुळे अप मार्गावरील काही गाड्यांवर परिणाम झाला. प्लॅटफॉर्मवरून ट्रेन काढण्यासाठी टीमला कसरत करावी लागली.

या घटनेनंतर स्थानकात एकच खळबळ उडाली

या घटनेनंतर स्थानकावर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आढावा घेतला. एएमयू ट्रेनला प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात मदत पथक व्यस्त होते. रेल्वेने कुणालाही धडक दिली नाही हे सुदैवाचे आहे, अन्यथा जीवित व वित्तहानी झाली असती, असे लोकांनी सांगितले.

(हेही वाचा: शेतात गेलेल्या महिलेचा आधी कापला गळा, मृतदेहही जाळला; थरकाप उडणारी घटना वाचा सविस्तर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -