घरठाणेशनिवारी रात्री हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक; शेवटची लोकल किती वाजता सुटणार?

शनिवारी रात्री हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक; शेवटची लोकल किती वाजता सुटणार?

Subscribe

मुंबई : येत्या वीकेंडला मध्य रेल्वेच्या उपनगरीय हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग काम आणि डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाउन लाईनच्या बांधकामासाठी घेण्यात येणार आहे. यामुळे बेलापूर (वगळून) आणि पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावर 30 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत असा एकूण 38 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून 30 सप्टेंबरला रात्री 9 वाजता शेवटची लोकल सुटणार आहे.

या ब्लॉकमुळे हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान उपनगरीय एकही लोकल धावणार नाही. ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ही ठाणे आणि नेरूळ/वाश स्थानकादरम्यान धावणार आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा ही बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट किंवा ओरीजनेट होतील. डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटीची लोकल ट्रेन ही छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस येथून रात्री 9.02 वाजता सुटेल आणि 30 सप्टेंबर रात्री 10.22 वाजता पनवेलला पोहोचेल.

- Advertisement -

हेही वाचा – शर्मिला ठाकरेंच्या भेटीनंतर तृप्ती देवरुखकर-एकबोटेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पनवेलहून अप हार्बर मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल ही शनिवारी रात्री 10.35 वाजता पनवेलहून सुटेल आणि रात्री 11.54 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचले. तर डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून रात्री 9.36 वाजता सुटेल आणि 10.28 वाजता पनवेलला पोहोचेल.

- Advertisement -

हेही वाचा – ‘जर पुन्हा असं घडलं तर गालावर…’ मराठी महिलेला घर नाकारल्याप्रकरणी राज यांचा ‘ठाकरे’ शैलीत समाचार

ब्लॉकनंतर अशा धावणार लोकल ट्रेन

ब्लॉकनंतर पनवेलसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली लोकल ट्रेन ही 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.08 वाजता सुटेल आणि दुपारी 1.29 वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेल येथून 1.37 वाजता सुटेल. यानंतर 2.56 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. त्याचबरोबर ठाणे ते पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन ही 1.24 वाजता ठाण्याहून सुटेल आणि ती लोकल 2.16 वाजता पोहोचले. तर पनवेलहून ठाण्यासाठी पहिली लोकल ट्रेन ही पनवेलहून 2.01 वाजता सुटेल आणि ठाण्यात 2.54 वाजता पोहोचेल.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -