हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. आठवड्यातील प्रत्येक वार वेग-वेगळ्या देवी-देवातांना समर्पित करण्यात आला आहे. गुरुवार आणि महिन्यातील एकादशी व्रत श्री विष्णूंना समर्पित करण्यात आले आहे. सध्या अधिक महिना सुरु आहे त्यामुळे या काळात श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांच्या प्रभावशाली द्वादश अक्षर मंत्राचा जप करु शकता. हा मंत्र श्री विष्णूंचा अत्यंत प्रिय मंत्र असून या मंत्राचा नियमित जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्री विष्णूंचा महाप्रभावशाली द्वादश अक्षर मंत्र
”ॐ नमो भगवते वासुदेवाय”
मंत्राचा अर्थ
ॐ – ओम हा लौकीक ध्वनि आहे
नमो – अभिवादन व नमस्कार
भगवते – शक्तिशाली, दयाळू आणि जो दिव्य आहे.
वासुदेवाय – वासु चा अर्थ सर्व प्राणांमध्ये आयुष्य आणि देवाय चा अर्थ ईश्वर
‘या’ मंत्राचा जप करण्याचे फायदे
- हा द्वादश अक्षर मंत्र केवळ एक मंत्र नसून भगवान विष्णूंचा महान मंत्र आहे. या महामंत्राच्या प्रभावाने साधकाला इच्छित फळ मिळते. तसेच त्या व्यक्तीवर नेहमी श्री विष्णूंची कृपादृष्टी असते.
- शक्ती, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी हा मंत्र जप करणे उत्तम मानले जाते.
- कुंडलीतील नवग्रहांचे दोष, अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी देखील तुम्ही या मंत्राचा जप करु शकता.
- कुंडलीतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी देखील या मंत्राचा जप करु शकता.
- या मंत्राच्या जप केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते.
मंत्राचा जप करण्याचे नियम
- धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचा जप करणं उत्तम मानले जाते.
- या मंत्राचा जप करण्यापूर्वी घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या मंत्राचा जप करावा.
- मंत्राचा जप करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये.
- श्री विष्णूंचे ध्यान करुन मंत्राचा जप करावा.
- दररोज कमीत-कमी 108 वेळा या मंत्राचा जप करावा.
- हा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या माळेचा वापर करु शकता.